शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:02 IST

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातात एका तरुणाने आपली गर्लफ्रेंड गमावली आहे. दुःखाने व्याकुळ झालेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये विमानातील २४१ जणांसह हे विमान ज्या इमारतींवर कोसळले तेथील काही जण अशा २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून त्याचा आक्रोश हेलावून टाकत आहे. 

विमान अपघातात एका तरुणाने आपली गर्लफ्रेंड गमावली आहे. दुःखाने व्याकुळ झालेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आला होता. पत्रकार तमाल सहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

"आम्हाला हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये हा तरुण दिसला. त्याच्या गर्लफ्रेंडचा मतदेह अजून त्याच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता. तो शांतपणे बसून एकटाच रडत होता. त्याने त्याची गर्लफ्रेंड गमावली. त्याच्या बाजूला कोणीही नव्हतं, फक्त आठवणी होत्या, त्या आठवणींसह आता त्याला आयुष्यभर जगायचं आहे. कोणाची वाट बघत आहात? असं विचारल्यावर त्याने फक्त MY LOVE असं उत्तर दिलं. बातमी समजताच तो मुंबईहून धावत आला" असं तमाल यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

"अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"

विजय रुपाणींचा लकी नंबर १२०६ ठरला मृत्यूचा दिवस

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा गुरुवारी अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रुपाणी हे १२०६ हा अंक स्वत:साठी भाग्यवान संख्या मानत होते. या आकड्यासोबत भावनिक नाते असल्यामुळे रुपाणी यांच्याकडील सर्व वाहनं १२०६ या क्रमांकाची होती. गुरुवारी अहमदाबादेत विमान अपघात झाला ती तारीख १२ जून म्हणजे १२०६ होती. त्यामुळे रुपाणी यांचा सर्वांत आवडता लकी नंबर दुर्दैवाने त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. रुपाणी यांच्या स्कूटरपासून कारपर्यंतच्या सर्व वाहनांचा १२०६ हा नंबर होता, असं स्थानिकांनी सांगितलं. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ