शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्या थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
5
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
6
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
8
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
9
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
10
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
11
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
12
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
13
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
14
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
15
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
16
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
17
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
18
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
19
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
20
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:38 IST

Ahmedabad Plane Crash : यमनने सर्व सामान पॅक केलं होतं. तो फ्लाईट पकडण्यासाठी घराबाहेर पडत होता. त्याने त्याच्या आईचा निरोप घेतला तेव्हा तो क्षण खूपच भावनिक होता. 

अहमदाबाद विमान अपघातानंतर मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले. याच दरम्यान यमन व्यास या तरुणाची हृदयस्पर्शी घटना समोर आली. यमनने सर्व सामान पॅक केलं होतं. तो फ्लाईट पकडण्यासाठी घराबाहेर पडत होता. त्याने त्याच्या आईचा निरोप घेतला तेव्हा तो क्षण खूपच भावनिक होता. 

यमनची आई तेव्हा त्याला म्हणाली की, तू आणखी काही दिवस थांबायला हवं होतं बेटा. आईचे हे शब्द ऐकताच यमन देखील खूप भावुक झाला आणि त्याने त्याचं तिकीट कॅन्सल केलं. यमन व्यास १२ जून रोजी त्याच फ्लाइटने प्रवास करणार होता, जे टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळलं. त्यामुळे आईनेच मुलाला मृत्यूच्या तावडीतून वाचवल्याचं म्हटलं जात आहे. 

"माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

घरी पोहोचल्यावर मिळाली अपघाताची माहिती 

यमनला जेव्हा विमान अपघाताबद्दल समजलं तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला.  त्याच्या आईमुळे त्याचा जीव वाचला. जैमिन आणि प्रिया पटेल यांच्यासोबतही असंच काहीस झालं आहे. अहमदाबादच्या चांदलोडिया येथील रहिवासी २९ वर्षीय जैमिन पटेल आणि २५ वर्षीय प्रिया पटेल यांना त्यांच्या मित्राने सुट्टीसाठी लंडनला बोलावलं होतं. एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने लंडनला जाणार होते. पण त्यांच्याकडे काही कागदपत्रं नसल्याने त्यांना विमानात चढू दिलं नाही. एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना खूप विनवणी करत राहिले. पण त्यांना विमानात चढू दिलं नाही आणि ते निराश होऊन घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांना अपघाताची माहिती मिळाली.

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव

विमानातील फक्त एकच प्रवासी वाचला

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील फक्त एकच प्रवासी या भयानक घटनेतून वाचला. त्याच्यावर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विश्वकुमार रमेश नावाचा हा प्रवासी बोईंग ७८७ ड्रीमलायनरच्या 'ए११' सीटवर होता, ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातGujaratगुजरातahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया