शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:29 IST

Air India Flight AI171 Crash : अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून तीन मोठ्या हस्ती प्रवास करत होत्या. यापैकी एक होते विजय रुपाणी...

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आणि देशभरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. एअर इंडियाच्या या विमानात २४२ जण होते, तर हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टलला धडकल्याने त्यात २० हून अधिक इंटर्न डॉक्टर देखील मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. अशातच या विमानात पश्चिम भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती होते, असे देखील सांगितले जात आहे. 

दुपारी १:३९ वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी २३ वरून एअर इंडियाचे हे विमान लंडनसाठी झेपावले होते. परंतू, पुढच्या तीन मिनिटांतच विमानाचे इंजिन बंद पडले आणि पायलटने विमान तसेच विमानतळाच्या दिशेने वळविले. परंतू, विमान खूपच खाली असल्याने विमानतळापर्यंत पायलट विमान पोहोचवू शकला नाही. यामुळे हे विमान नागरी वस्तीवर कोसळले. हॉस्टेलला धडकल्याने इंटर्न डॉक्टरांनाही जीव गमवावा लागला आहे. 

या विमानात महाराष्ट्रातील पाच ते सहा जण असल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी या विमानाची क्रू मेंबर होती. नागपूरमधील एक महिला जिचे लग्न अहमदाबादला झाले होते ती देखील तिचा लहान मुलगा आणि सासूसोबत प्रवास करत होती.तसेच सोलापूरचे पत्नी-पत्नी लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. अशातच गुजरातचे तीन महत्वाचे व्यक्ती देखील या विमानातून प्रवास करत होते. 

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच या विमानात टाटाच्या मोठ्या प्रमाणावर डीलरशीप असलेले कार्गो मोटर्स ग्रुपचे संस्थापक प्रमुख नंदा आपल्या दोन मुले आणि पत्नीसह लंडनला जात होते. तसेच आणखी एक मोठी कंपनी लुबी मोटर्स पंपचे संचालक सुभाष अमीन देखील प्रवास करत होते. 

प्रमुख नंदा यांची पत्नी नेहा नंदा, मुलगा प्रवेश नंदा आणि प्रयास प्रमुख नंदा यांच्यासोबत प्रवास करत होते. या सर्वांची नावे या विमानात बसलेल्या प्रवाशांच्या यादीत आहेत. अद्याप मृतांची यादी जाहीर झालेली नसल्याने अधिकृतरित्या काहीही सांगितले जात नसले तरी त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात