शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:20 IST

Air India Flight AI171 Crash: विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत.

Air India Plane Crash:अहमदाबादविमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाच्याअपघातामुळे देश हळहळला आहे. दुपारी बोईंग एआय - १७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचे इंजिन फेल झाले. पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, परंतू विमान एवढ्या कमी उंचीवर होते की पायलटही काही करू शकले नाहीत आणि विमान झाडांवर आदळले व मोठा अपघात झाला. 

विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. इमारतींच्या परिसरातील वाहने जळून खाक झाली आहेत. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. 

विमानाचा पाठीमागचा भाग खाली झुकल्याने तो झाडांवर आणि नंतर इमारतीच्या छतावर आदळला. यामुळे विमानाला आग लागली. अद्याप ब्लॅक बॉक्स मिळालला नाहीय. त्यावरून नेमका अपघात कसा झाला आणि त्याचे कारण काय याची माहिती मिळणार आहे.  

अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता निघालेले हे विमान बोईंग ७८७-८ विमान होते ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरातahmedabadअहमदाबादAccidentअपघात