शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:21 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेले बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान हे एक अत्याधुनिक विमान असून, डिसेंबर २०१३मध्ये बोइंग ‘कमर्शिअल एअरप्लेन्स’ने ते बनवले होते. बोइंग ७८७ विमानाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच अपघात आहे. अपघातग्रस्त विमानाची इत्यंभूत माहिती खालीलप्रमाणे आहे.  

 नवी दिल्ली : अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेले बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान हे एक अत्याधुनिक विमान असून, डिसेंबर २०१३मध्ये बोइंग ‘कमर्शिअल एअरप्लेन्स’ने ते बनवले होते. बोइंग ७८७ विमानाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच अपघात आहे. अपघातग्रस्त विमानाची इत्यंभूत माहिती खालीलप्रमाणे आहे.  

बोइंग ७८७ ड्रीमलाइनर  नेमके आहे तरी कसे?बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर हे बोइंगने बनवलेले एक आधुनिक, मध्यम आकाराचे, जुळे इंजिन असलेले, रुंद-बॉडी जेट विमान आहे. ते लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे आणि जुन्या बोइंग ७६७ ची जागा घेण्यासाठी ते तयार केले आहे. हे इंधन-कार्यक्षम विमान आहे.

विमानाचा इतिहास काय?बोइंगने २००३मध्ये ‘७ ई ७’ प्रकल्पांतर्गत त्याची निर्मिती सुरू केली होती. नंतर याला ५ लाख ऑनलाइन मतांनंतर ड्रीमलाइनर असे नाव देण्यात आले.पहिले उड्डाण २००९ मध्ये झाले आणि पहिले विमान २०११ मध्ये एएनएला देण्यात आले. सुरुवातीला काही विलंब झाला होता, परंतु आता ते जगभरात लोकप्रिय आहे. १५ वर्षांच्या इतिहासात हे विमान पहिल्यांदाच क्रॅश झाले आहे. यापूर्वी लिथियम आयन बॅटरीमध्ये आग आणि बॉडीच्या सांध्यामध्ये अंतर अशा तक्रारी आल्या होत्या.

किती इंधन वाचवते?बोइंग ७८७-८ हे विमान बोइंग ७६७ सारख्या विमानांच्या तुलनेत २० ते २५ टक्के इंधन वाचवते. 

खास वैशिष्ट्य काय?विमानाचा ५० टक्के हिस्सा कार्बन फायबरचा बनलेला असतो. त्यामुळे ते हलके आहे. ड्रीमलाइनरच्या खिडक्या आकाराने सर्वांत मोठ्या २७X४७ सें.मी. आहेत.केबिन प्रेशर १,९०० मीटर उंचीसारखे ठेवले जाते. त्यामुळे प्रवाशांना ८ टक्के जास्त ऑक्सिजन मिळतो. केबिनमध्ये रंग बदलणारी एलईडी लायटिंग आहे. टाइम झोन बदलाचा परिणाम त्यामुळे कमी होतो.ओव्हरहेड बिन्समध्ये प्रत्येक प्रवाशाची रोल-अबोर्ड बॅग सहजपणे बसते. 

भारताशी संबंध काय?भारतात ‘एअर इंडिया’ याचा वापर करते. २०१२मध्ये एअर इंडियाने साउथ कॅरोलिना प्रकल्पातून पहिले ७८७-८ विमान घेतले होते. ते दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-लंडन अशा दीर्घ मार्गांवर उडते.

पल्ला - प्रवासी क्षमता किती?हे विमान २०० ते २५० प्रवासी वाहून नेऊ शकते. एकदा आकाशात झेपावल्यानंतर सलग १४ हजार किलोमीटर उडू शकते. दिल्लीहून न्यूयॉर्कला अथवा टोकिओला एका उड्डाणात जाऊ शकते.

इंजिनाचा परफाॅर्मन्स कसा ?विमानात रोल्स-रॉयस ट्रेंट १००० अथवा जनरल इलेक्ट्रिक जीईएनएक्सची २ विमाने असतात. ते ६० टक्के कमी गोंगाट करतात.

प्रवाशांसाठी सुविधा काय?एअरलाइन्सच्या हिशेबाने वेगवेगळे लेआऊट कंपनी देते. ‘एनएनए’मध्ये ३२ बिझनेस, १४ प्रीमियम इकॉनॉमी आणि १३८ इकॉनॉमी आसने आहेत.प्रवाशास वैयक्तिक टीव्ही, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स आणि पाॅवर आउटलेट्स मिळतात. आवाज कमी असल्यामुळे शांत प्रवास होतो. आसने आरामदायक आहेत.

पर्यावरणासाठी किती चांगले?२० ते २५ टक्के कमी इंधन खर्च करते, ५० टक्के कमी कार्बनडायॉक्साईड उत्सर्जनकरते व इंजिनाचा आवाज ६० टक्के कमी होतो. त्यामुळे पर्यावरणासाठी ते सर्वोत्तम मानले जाते.

उणिवा काय आहेत?काही प्रवाशांना इकॉनॉमी आसने (३-३-३ लेआउट) थोडी अरुंद वाटतात. २०१३मध्ये बॅटरी समस्येमुळे विमाने काही काळ जमिनीवर आणली गेली होती. 

विमाने जसजशी जुनी होतील, तसतसे अपघात वाढतीलया विमानात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याची काही उदाहरणे गेल्या काही दिवसांत घडली आहेत. बोइंग कंपनीतील अभियंता सॅम सालेहपूर यांनी नुकताच असा आरोप केला होता की, बोइंगने ७७७ आणि ७८७ ड्रीमलाइनर विमानांच्या उत्पादनात शॉर्टकट्स घेतले. त्यामुळे ही विमाने जसजशी जुनी होतील, तसतसे त्यांच्यात मोठे तांत्रिक बिघाड होण्याचा तसेच त्यांना मोठा अपघात होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. 

टॅग्स :airplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय