शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

यंदा करसवलतीचा उतारा; ८ वर्षांनी वाढविणार का मर्यादा? मध्यमवर्गीयांची अपेक्षा वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:05 IST

पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा वाढविली जाऊ शकते.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये लाेकांचे राहणीमान बदलले आहे. त्यासोबतच महागाईदेखील वाढली आहे. कर सवलत वाढविल्यास महागाई नियंत्रणात येऊ शकते, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये मिळणाऱ्या कर सवलतीची सध्याची १.५ लाख रुपयांची मर्यादा वाढविली जाण्याची अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

२००५ मध्ये ८० सी कर सवलतीची मर्यादा १ लाख रुपये होती. २०१४-१५ मध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ती वाढवून १.५ लाख रुपये केली होती. तेव्हापासून यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा वाढविली जाऊ शकते.

जुन्या कर व्यवस्थेलाच पसंती

२०२०च्या अर्थसंकल्पात नवी कर व्यवस्था सादर करण्यात आली असली तरी लोक जुन्या कर व्यवस्थेलाच पसंती देत आहेत. कारण, यात कर बचतीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. जुन्या योजनेत ८० सी अन्वये सुमारे १० बाबींवर कर सवलत मिळते. यात गृहकर्जाची मुद्दल, जीवन विमा पॉलिसीचे हप्ते, अल्प बचत योजनांतील गुंतवणूक व इक्विटी लिंक्ड बचत योजना यांचा समावेश आहे.

करसवलत वाढविण्याची गरज

मागील काही वर्षांत महागाई वाढली आहे. राहणीमानाचा खर्च सातत्याने वाढत आहे. वाढत्या व्याजामुळे कर्जाचे हप्ते वाढले आहेत. त्यामुळे करसवलत वाढविण्याची गरज आहे. शिवाय ८० सी अन्वये देण्यात येणाऱ्या कर सवलतीमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. 

सध्या गुंतवणुकीसाठी संधी कमी

सध्या १० प्रकारांवर ८० सी अंतर्गत करसवलत मिळते. पीएफ अनुदान आणि गृहकर्जाची मूळ रक्कम हे यापैकी माेठा हिस्सा व्यापतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी फार जागा मिळत नाही. 

कर सवलतीची मर्यादा वाढविल्यास लाेक अधिक गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूक वाढणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही चांगले आहे.     - लेखा चक्रवर्ती, प्राध्यापक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पाॅलिसी

टॅग्स :TaxकरIndiaभारत