शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 22:14 IST

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलच्या कोठडीत वाढ

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी चॉपर खरेदी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला मध्यस्त ख्रिश्चिअन मिशेलला इतरही सुरक्षा करारांमध्ये पैसे मिळाल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयानं केला. दिल्ली कोर्टाला सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या संरक्षण करारांमध्येही मिशेल मध्यस्त होता. याची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे, असं ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. यानंतर कोर्टानं मिशेलला 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मिशेलला ऑगस्टा वेस्टलँड करारातून 2.42 कोटी युरो (जवळपास 192 कोटी रुपये) आणि 1.6 कोटी पाऊंड (जवळपास 142 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली, अशी आकडेवारी ईडीनं विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांना दिली. 'ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात सध्या मिशेलची चौकशी सुरू आहे. त्यातून दुसऱ्या संरक्षण करारांमध्येही मिशेलला पैसे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे,' असं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. मिशेल रोकड मिळवण्यासाठी आणि मालमत्तेच्या खरेदीसाठी हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून पैसे घ्यायचा, अशी माहिती ईडीचे वकील डी. पी. सिंह आणि एन. के. मत्ता यांनी न्यायालयाला दिली. आज मिशेलची 14 दिवसांची कोठडी संपत होती. त्यामुळेच ईडीनं त्याला न्यायालयात हजर केलं. मिशेलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती ईडीकडून करण्यात आली होती. मिशेलला जामीन मिळाल्यास तो देशाबाहेर पळून जाऊ शकतो, अशी भीती ईडीच्या वकिलांनी व्यक्त केली होती.  

टॅग्स :congressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय