जय श्रीरामच्या घोषणा देत ताजमहालमध्ये फडकावला भगवा, चौघांना अटक

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 5, 2021 01:26 PM2021-01-05T13:26:32+5:302021-01-05T13:27:46+5:30

यावेळी ताजमहालच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच या नेत्यांनी ताजमहाल परिसराती हा भगवा ध्वज फडकावण्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला.

Agra Taj Mahal Hindu community leaders hoisted saffron flag and chanting Jai Shree Ram slogan | जय श्रीरामच्या घोषणा देत ताजमहालमध्ये फडकावला भगवा, चौघांना अटक

जय श्रीरामच्या घोषणा देत ताजमहालमध्ये फडकावला भगवा, चौघांना अटक

Next

आग्रा - ताजमहाल परिसरात सोमवारी हिंदूत्ववादी नेत्यांनी भगवा ध्वड फडकावला. हे नेते ताजमहाल परिसरात आले. ते यथे एका बेंचवर बसले आणि त्यांनी आपल्या खिशातून भगवा ध्वज काढून तो फडकवायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर या नेत्यांनी यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या.

यावेळी ताजमहालच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच या नेत्यांनी ताजमहाल परिसराती हा भगवा ध्वज फडकावण्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये, हिंदुत्ववादी नेते ताजमहालच्या परिसरात कशाप्रकारे भगवा ध्वज फडकावत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. 

यानंतर, सीआयएसफने ताजमहाल परिसरातच या हिंदूत्ववादी नेत्यांना ताब्यात घेतले आणि ताजगंज पोलिसांच्या ताब्यात दिले. सीआयएसफकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ताजगंज पोलिसांनी या नेत्यांवर, धार्मिक भावना दुखावणे आणि अशांतता पसरवण्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

सांगण्यात येते, की हिंदुत्वादी नेते आपल्या खिशात भगवा ध्वज घेऊन ताजमहालमध्ये शिरले. यानंतर ते रेड सॅन्ड स्टोन प्लॅटफार्मखाली असलेल्या लाल दगडावर बसले आणि नंतर त्यांनी आपल्या खिशातून भगवे ध्वज काढून फडकवायला सुरुवात केली. तसेच त्यांनी यावेळी हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या.

याप्रकरणी पोलिसांनी, हिंदू युवा वाहिनीचे जिला अध्यक्ष गौरव ठाकूर, सोनू बघेल, विशेष कुमार आणि ऋषी लवानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी नेते गौरव ठाकूर यांनी, यापूर्वीही ताजमहालमध्ये शिव चालीसा पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. पोलीस पुढील कारवाई करत आहे. 

Web Title: Agra Taj Mahal Hindu community leaders hoisted saffron flag and chanting Jai Shree Ram slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.