अरे देवा! "माझ्या महागड्या क्रीम-पावडरने मेकअप करून सासू घरभर फिरते"; सुनेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:44 IST2024-01-30T12:43:46+5:302024-01-30T12:44:09+5:30
सासूने सुनेचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरल्याने सासू आणि सून यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.

अरे देवा! "माझ्या महागड्या क्रीम-पावडरने मेकअप करून सासू घरभर फिरते"; सुनेचा आरोप
पोलीस मोठ्या गुन्ह्यांची उकल करतात मात्र जर एखाद्या विषयावरून सासू-सून यांच्यात भांडण झालं तर ते सोडवताना त्यांना नाकीनऊ आल्याची घटना आता समोर आली आहे. सासू-सुनेच्या भांडणाचे अजब प्रकरण आग्रा पोलिसांसमोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सासूने सुनेचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरल्याने सासू आणि सून यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. सासू आणि सुनेचे हे प्रकरण घर सोडून थेट पोलीस ठाण्यात पोहोचले असून आता याप्रकरणी समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे.
सुनेचा आरोप आहे की सासू तिच्या मेकअपचं सर्व सामान वापरते. ती याबाबत तक्रार करते तेव्हा नवराही त्यांच्या आईचीच साथ देतो. विरोध केला असता आई-मुलाने बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं. यानंतर सुनेने कौटुंबिक समुपदेशन केंद्रात न्यायाची मागणी केली आहे.
मालपुरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींचा विवाह फतेहाबाद येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मोठ्या सुनेचा आरोप आहे की तिची सासू मेकअप बॉक्समधून क्रीम-पावडर घेते आणि लावते. घरी असतानाही ती मेकअप करून फिरते. घरी असताना सुनेने महागडी क्रीम लावायला मनाई केल्याने सासूला राग आला.
घरात भांडण झालं. पती आणि सासूने तिला मारहाण केली. दोन महिन्यांपूर्वीही तिला मारहाण करून घरातून हाकलून दिलं होतं. मी माहेरी राहते. दोन्ही बाजुच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समुपदेशक डॉ.अमित गौर यांनी सांगितलं. मात्र प्रकरण शांत झालेलं नाही. दोन्ही लोकांना पुढील तारीख देण्यात आली आहे.