आग्रा धर्मांतर वाद: मुख्य आरोपी बाल्मिकी जेरबंद

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:15+5:302014-12-16T23:44:15+5:30

आग्रा-अलीकडेच १०० जणांना कथित रूपाने बळजबरी धर्म परिवर्तन करायला भाग पाडलेला मुख्य आरोपी नंदकिशोर बाल्मिकी याला पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याने हरिपर्बत ठाण्यात सकाळी आत्मसमर्पण केले होते.

Agra conviction controversy: Chief accused Balmiki Zerband | आग्रा धर्मांतर वाद: मुख्य आरोपी बाल्मिकी जेरबंद

आग्रा धर्मांतर वाद: मुख्य आरोपी बाल्मिकी जेरबंद

्रा-अलीकडेच १०० जणांना कथित रूपाने बळजबरी धर्म परिवर्तन करायला भाग पाडलेला मुख्य आरोपी नंदकिशोर बाल्मिकी याला पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याने हरिपर्बत ठाण्यात सकाळी आत्मसमर्पण केले होते.
त्याने १०० जणांचे बळजबरी धर्मांतर केल्याची तक्रार धर्म जागरण मंचाने केली होती. यातील बहुसंख्य लोक हे झोपडपट्टीत राहणारे व मुस्लीम होते. पोलिसांनी इस्माईल नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार, विविध गटांमध्ये शत्रूत्व वाढविणे, फसवणूक करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाल्मिकीला अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी घातल्या होत्या. तसेच त्याची माहिती देणाऱ्यास १२ हजारांचे बक्षीसही घोषित केले होते. १४ डिसेंबर रोजी बाल्मिकीने पोलिसांना चकवून पळ काढला मात्र त्याचा मुलगा राहुल व नातेवाईक कृष्णकुमार यांना अटक करण्यात आली होती.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक शलभ माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या अटकेकरिता सतत दबाव येत होता. त्याच्यावर आधी पाच हजारांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते व त्यात नंतर वाढ करण्यात येऊन ते १२ हजार केले होते.

पुनर्धर्मांतरणाची प्रक्रिया सुरू राहील-आदित्यनाथ
नवी दिल्ली-धर्मांतरणाच्या मुद्यावर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीत भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुनर्धर्मांतरण ही निरंतर प्रक्रिया आहे व ती सुरू राहील असे म्हटले आहे. जर पुनर्धर्मांतर हे चुकीचे आहे असे जर सरकारला वाटत असेल तर अन्य राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशातही तसा कायदा बनविला जावा अशी टिप्पणी त्यांनी पुढे केली.

Web Title: Agra conviction controversy: Chief accused Balmiki Zerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.