"नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत", राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:56 PM2022-06-27T16:56:40+5:302022-06-27T17:01:24+5:30
Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशात सत्याग्रह केला.
Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
संबंधित बातमी- निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी
'विमानतळ देऊन मित्रांना श्रीमंत बनवले'
केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान आपल्या मित्रांना 50 वर्षांसाठी देशातील विमानतळे देऊन 'दौलतवीर' बनवत आहेत आणि तरुणांना केवळ 4 वर्षांच्या करारावर 'अग्नीवीर' बनवले जात आहे. आज अग्निपथविरोधात काँग्रेस देशभरात सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत तरुणांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह थांबणार नाही,' असे ट्विट राहुल यांनी केले.
प्रधानमंत्री अपने ‘मित्रों’ को 50 साल के लिए देश के एयरपोर्ट देकर 'दौलतवीर' और युवाओं को सिर्फ़ 4 साल के ठेके पर 'अग्निवीर' बना रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 27, 2022
आज देश भर में कांग्रेस पार्टी ‘अग्निपथ’ के ख़िलाफ़ #SatyagrahaForYouth कर रही है। जब तक युवाओं को इंसाफ़ नहीं मिलता, ये सत्याग्रह नहीं रुकेगा।
यूपीत काँग्रेसचा सत्याग्रह
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सत्याग्रह करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते विकास श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अन्यायकारक तुघलकी अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश काँग्रेस जोरदार विरोध करत आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा-शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सत्याग्रह करण्यात आला.
'ही दोन व्यक्तींमधील नाही तर दोन भिन्न विचारधारांची लढाई', राहुल गांधींचे टीकास्त्र
'...तर तरुणांचे लग्नही होणार नाही'
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी 'अग्निपथ' योजनेला विरोध करत सरकारने या योजनेचा पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. मलिक म्हणाले की, जवान सहा महिने प्रशिक्षण घेतील, सहा महिन्यांची रजा आणि तीन वर्षांच्या सेवेनंतर घरी परतल्यावर त्याचे लग्नही होणार नाही.