शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीरांना चार वर्षांनंतर भाजपा कार्यालयांसाठी सुरक्षा रक्षक म्हणून प्राधान्य: कैलास विजयवर्गीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 17:41 IST

Kailash Vijayvargiya On agneepath Scheme : विजयवर्गीय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय सैन्यासाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना घोषित केली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बिहारसह देशभरातील डझनभर राज्यांत संतप्त तरुणांनी हिंसक आंदोलन केले. रेल्वे गाड्या, बसेस जाळल्या आहेत. यामुळे राज्य सरकारांनी अग्निवीरांना चार वर्षांनी नोकऱ्यांत प्राधान्य देण्याच्या घोषणा करत तरुणांमधील राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 

परंतू, भाजपाने अग्निवीरांना आपल्याकडे नोकरी देण्याची घोषणा केली आहे. चार वर्षांनी पुढे काय? या प्रश्नावरून वातावरण तापलेले असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी भाजपा कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक नेमायचे असतील तेव्हा चार वर्षांनी बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना नोकरीसाठी प्राधान्य देईन, अशी घोषणा केली आहे. इंदौरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

यावरून आता विजवर्गीय यांना विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. विजयवर्गीय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, देशातील तरुणांचा आणि सैन्याच्या जवानांचा एवढाही अपमान करू नका. ते शारीरिक चाचणी पास करण्यासाठी कठोर मेहनत घेतात. चाचण्या पास करतात. त्यांना आयुष्यभर देश सेवा करायची असते. त्यांना भाजपाच्या कार्यालयाबाहेर गार्ड म्हणून रहायचे नाहीय. 

 

जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBJPभाजपा