शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला

By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 3:13 PM

Farmer News : नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहेआता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून, या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.शेतकरी नेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेले स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आज सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल रात्री गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थिती सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही.

यादव यांनी सांगितले की, या मुद्यावर बुराडी येथे आज संध्याकाळी चार वाजता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी सांगितले की, २६ तारखेला दिल्ली चलोची जी हाक देण्यात आली होती ती संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आली होती. संयुक्त किसान मोर्चामध्ये देशभरातील ४५० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना ७ सदस्यांची एक समिती बनवण्यात आली होती. त्या सात सदस्यांपैकी मी एक आहे.सध्या शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीला इतर राज्यांना जोडणाऱ्या सीमांवर जमले आहेत. पंजाबमधून आलेले शेतकरी दिल्लीतील सिंघू आणि टिकरी सीमेवर जमले आहेत. तर उत्तर प्रदेशच्या सीमेवरसुद्धा भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी शनिवारी दिल्लीतील एका बाजूला कूच केली आणि दिल्लीतील विविध सीमांवर ठाण मांडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतdelhiदिल्ली