आग्र्यात चर्चवर हल्ला, २४ तासांत कारवाईची मागणी

By Admin | Updated: April 16, 2015 16:40 IST2015-04-16T16:14:27+5:302015-04-16T16:40:56+5:30

प्रताबपूरा कंन्टोनमेंट बोर्डाच्या परिसरातील एका चर्चमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी चर्च व पुतळ्यांची मोडतोड केली आहे.

Agitation demanded action against the church in 24 hours | आग्र्यात चर्चवर हल्ला, २४ तासांत कारवाईची मागणी

आग्र्यात चर्चवर हल्ला, २४ तासांत कारवाईची मागणी

>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १६ - प्रताबपूरा कंन्टोनमेंट बोर्डाच्या परिसरातील एका चर्चमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी चर्च व पुतळ्यांची मोडतोड केली आहे.
ही घटना पहाटेच्या वेळी घडली असून चर्चच्या आवारात उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचांची मोडतोडही या अज्ञात हल्लेखोरांनी केली आहे. या गाडीचे अलार्म वाजल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या हल्लेखोरांनी दोन पुतळ्यांचीही मोडतोड केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राकबगंज पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध करत येथील चर्चच्या पाद्रींनी येत्या २४ तासांत गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे. 
मार्च महिन्यात पश्चिम बंगाल येथील एका कॉन्वेन्ट शाळेतील सेविकेवर बलात्कार करून गुन्हेगारांनी पैसेही लुटले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन बांग्लादेशी व्यक्तींना १४ मार्च रोजी अटक केली होती. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर येथे कॅथ्रकेडल इमारत व मिशन-यांच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका उजव्या हिंदुत्ववादी गटाच्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती, व कालांतराने त्यांना जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले होते. 
 

Web Title: Agitation demanded action against the church in 24 hours