शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये आंदोलक आक्रमक; अमित शहांच्या घराजवळ निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 4:56 AM

ड्रोनच्या मदतीने बारीक लक्ष; शर्मिष्ठा मुखर्जींसह काँग्रेसचे ५० कार्यकर्ते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करणाऱ्या दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शर्मिष्ठा मुखर्जी व त्यांच्यासमवेत असलेल्या ५० महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. शर्मिष्ठा मुखर्जी या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या आहेत. या सर्वांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. लोकशाही मार्गाने व शांततेने निदर्शने करत असूनही आम्हाला ताब्यात घेण्यात आले, असा आरोप या निदर्शकांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात आंदोलक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली.

उत्तर दिल्लीत जमावबंदी लागूउत्तर दिल्लीतील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली. या परिसरात पोलिसांनी ध्वजसंचलन केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधातील आंदोलनात तीन दिवसांपूर्वी या भागामध्ये हिंसाचार झाला होता. तेथील परिस्थितीवर ड्रोन विमानांच्या सहाय्याने पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी पोलिस सहआयुक्त आलोककुमार, पोलीस उपायुक्त वेदप्रकाश सूर्या यांच्या उपस्थितीत पोलिसांनी उत्तर दिल्लीमध्ये ध्वजसंचलन केले. सीलमपूर भागामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी रशिद नावाच्या आरोपीस गुरुवारी अटक करण्यात आली आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या व जंतरमंतरकडे जाणाºया निदर्शकांना शुक्रवारी दुपारी दिल्ली गेटनजिक अडविण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून चावरी बाजार, लाल किल्ला, जामा मशीद येथील तीन मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. नागरिकत्व कायदाविरोधात पोलिसांच्या गोळीबारात कर्नाटकमधील मंगळुरू येथे गुरुवारी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तसेच आंदोलकांनी रेल व रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून सुरक्षा दले अतिशय सतर्क आहेत.

आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरूगुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आसाममध्ये गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून ही सेवा स्थगित केलेली होती. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी शांततेने निदर्शने पार पडली.अनेक राज्यांत सुरक्षा दले सतर्कच्उत्तर प्रदेशमधील इंटरनेट व एसएमएस सेवेवरील स्थगिती अद्याप उठविण्यात आलेली नाही. अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केल्यानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा दले सतर्क आहेत. या शहरातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.केरळमध्येही तणावाचे वातावरणच्कर्नाटकामध्ये हिंसाचार झाल्याचे लक्षात घेऊन केरळमधील वायनाड, कासारगोड, कोडिकोळ, कन्नूर या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.च्कर्नाटकमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचे वृत्त पसरताच केरळमध्येही विविध ठिकाणी गुरुवारी रात्रीपासून निदर्शकांनी रास्ता व रेल रोको आंदोलन केले. कर्नाटकमधील मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक