Yasin Malik: यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 21:45 IST2022-05-25T21:44:38+5:302022-05-25T21:45:22+5:30
Yasin Malik News: काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलिकला कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे.

Yasin Malik: यासिन मलिकला जन्मठेप होताच पाकिस्तानचा तिळपापड, पंतप्रधानांनी भारताविरोधात उधळली मुक्ताफळे
इस्लामाबाद - काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलिकला कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत यासिन मलिक याचा बचाव केला आहे. आजचा दिवस भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत.
टेरर फंडींगच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या यासिन मलिक याला दिल्लीतील एनआयए कोर्टाने आज शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेमुळे काश्मीरमध्ये फुटीरतावाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनीही प्रतिक्रिया देत गरळ ओकली आहे. भारत यासिन मलिकला शारीरिकदृष्ट्या कैद करू शकतो, मात्र तो स्वातंत्र्याच्या विचारांना कैद करू शकणार नाही, ज्याचा तो प्रतीक आहे. या बहादूर स्वातंत्र्यसैनिकाला दिलेली जन्मठेप काश्मीरच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला गती देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यानेही या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये सांगितले की, पाकिस्तान खोट्या आरोपांखाली यासिन मलिकला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध करतो. अशाप्रकारची दमनकारी रणनीती काश्मिरी लोकांच्या भावना दाबू शकणार नाही. आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या स्वयंनिर्णयाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत आहोत.
टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिक हा दोषी आढळला आहे. एनआयए कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याबरोबरच त्याला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान एनआयएने मलिकला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.