शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतरही मोदींची लोकप्रियता कायम, 'अच्छे दिन' येत असल्याचा लोकांचा विश्वास - सर्व्हेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्यापही लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहे. इतकंच नाही तर देशाच्या आर्थिक स्थितीवर लोक समाधानी आहेत.

ठळक मुद्देतीन वर्षानंतरही मोदींची लोकप्रियता कायम असून लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहेप्यू रिसर्च संस्थेने 2464 भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केलीसर्व्हेक्षणात मोदी 88 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 58 टक्क्यांसह दुस-या क्रमांकावर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्यापही लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहे. इतकंच नाही तर देशाच्या आर्थिक स्थितीवर लोक समाधानी आहेत. अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्चच्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तीन वर्षातील हनीमून पीरिअड भलेही संपला असला, तरी लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कमी झालेला नाही. जवळपास 10 पैकी 9 भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. 2015 मध्ये हा आकडा 10 पैकी 7 होता. 

प्यू रिसर्च संस्थेने 2464 भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. 21 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. महत्वाचं म्हणजे या सर्व्हेक्षणात मोदी 88 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 58 टक्क्यांसह दुस-या क्रमांकावर आहेत. तिस-या क्रमांकावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (57 टक्के) आहेत. 

सर्व्हेक्षणानुसार मोदींची लोकप्रियता एखाद्या विशेष ठिकाणापुर्ती मर्यादित नसून संपुर्ण भारतभर आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही 10 पैकी 9 लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे. दुसरकीडे गुजरात, महाराष्ट्र यांच्याशिवाय छत्तीसगडमधील जनताही मोदींसाठी सकारात्मक आहे.

74 टक्के लोकांची मोदींनी पसंतीयाशिवाय पूर्व भारत म्हणून ओळखल्या जाणा-या बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालसहित उत्तर भारतातील राज्यं दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील 10 पैकी 8 लोकांनी मोदींच्या बाजूने मत मांडलं आहे. 2015 नंतर उत्तर भारतात मोदींच्या लोकप्रियतेत कोणताही प्रभाव पडलेला नाही. दुसरीकडे दक्षिण आणि पश्चिम भारतात तर त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. पुर्व भारतमध्ये लोकप्रियता थोडी कमी झाल्याचं पहायला मिळालं. सर्व्हेक्षणानुसार, लोकप्रियतेच्या बाबतीच मोदींनी इतर नेत्यांना खूप मागे टाकलं आहे. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधींपेक्षा मोदींची लोकप्रियता जास्तकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी तुलना करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता 31 टक्के आणि राहुल गांधींशी तुलना करता 30 टक्के जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 88 टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे, जर सोनिया गांधींवर 57 आणि राहुल गांधींवर 58 टक्के लोकांनी विश्वास दाखवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 39 टक्के भारतीयांची निवड आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी