शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनी मीच उद्घाटनाला येईन; मोदी यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 14:13 IST

या भाषणात मोदी यांनी काँग्रेसवर खूपच कमी आरोप केले. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख पटनायकच होते.

तालचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये आज विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ओडिशातील बिजू जनता दलावर आरोप करत मुख्यमंत्री नविन पटनायक यांच्यावर टीका केली. तसेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा दावाही केला. मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि मीच उद्घाटनाला येईन, असे त्यांनी सूचित केले.

महत्वाचे म्हणजे या भाषणात मोदी यांनी काँग्रेसवर खूपच कमी आरोप केले. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख पटनायकच होते. यामुळे पंतप्रधानांनी जाहीरपणे पुढील काळात ओडिशामध्ये भाजप विरोधात बीजेडी असणार असल्याचे संकेत दिले. 

मोदी म्हणाले की, खत निर्मितीच्या कारखान्यावर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2000 मध्ये तालचर खत निर्मितीच्या कारखान्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा कारखाना धूळ खात पडून होता. अधिकाऱ्यांनी 36 महिन्यात या कारखान्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 36 महिन्यांनी मी या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. गोरखपूर, झारखंड, तेलंगानामधील खत निर्मितीच्या कारखान्यांची उदाहरणे देताना मोदी म्हणाले, तेथील सरकारे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत. राजीव गांधी म्हणाले होते, एक रुपयापैकी 15 पैसेच लोकांपर्यंत पोहोचत होते. आज बँकिंग प्रणालीमुळे अख्खा रुपया जनतेपर्यंत जात असल्याचे मोदी म्हणाले.

स्वच्छता मोहिमेवरून पटनायक यांच्यावर आरोप करताना मोदी म्हणाले  की, 2014 मध्ये गावांतील स्वच्छता केवळ 10 टक्के होती. आमच्या सरकारने त्यामध्ये वेग आणून 55 टक्के केली आहे. पटनायकना तेव्हा सांगितले होते, की देश पुढे जातोय ओडिशा मागे राहील. स्वच्छतागृह बनली नाहीत. ओडिशाच्या जनतेला चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात झारसुगुडा येथील विमानतळाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री नविन पटनायक उपस्थित होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOdishaओदिशाBiju Janata Dalबिजू जनता दलBJPभाजपा