तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 07:04 AM2019-01-11T07:04:19+5:302019-01-11T07:05:36+5:30

म्हणाले, जुन्या दोस्तांशी आघाडीस तयार : वाजपेयींच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याची दिली ग्वाही

 After three states, PM remembers Narendra Modi | तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

Next

चेन्नई : तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांची वाढत चाललेली संख्या
याचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मित्रपक्षांना सोबत घेण्याची भाषा सुरू केली आहे. मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास भाजपा तयार आहे. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करू. जुन्या मित्रांचाही सन्मानच करतो, असे मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आसाम गण परिषद रालोआतून बाहेर पडता. त्याआधी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, तेलगू देसमही बाहेर पडले, तर शिवसेना सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर टीका करीत असून, युती गेली खड्यात अशी उद्धव ठाकरे यांची भाषा आहे. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, पीएमके, एमडीएमकेसह सहा पक्षांच्या आघाडीने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा लढविल्या. त्यापैकी भाजप व पीएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर हे पाचही पक्ष आघाडीतून बाहेर पडले.
तामिळनाडूत बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधनाता मोदी म्हणाले की, १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी

आघाडी सरकार उत्तमरित्या चालवून दाखविले. त्यांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व दिले. या मार्गावरच भाजपाने पुढे वाटचाल केली आहे. आघाडीसाठी भाजपाचे दरवाजे सदैव खुले आहेत.
अद्रमुक, द्रमुक किंवा अभिनेते रजनीकांत यांच्याशी युती करणार का या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना नेहमीच वाईट वागणूक दिली. त्या-त्या राज्यांतील लोकांची मते, अस्मिता यांना कायम दुय्यम लेखले. राज्य करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा भ्रमात काँग्रेस पक्ष होता. 

एनडीए ही मजबूत आघाडी
मोदी म्हणाले की, रालोआ मजबूत आहे. त्यातील मित्रपक्षांचा परस्परांवर गाढ विश्वास आहे. भाजपाला स्वबळावर जरी बहुमत मिळाले तरी मित्रपक्षांनाही सरकारमध्ये घेऊ. जास्तीत जास्त लोक जोडणे हे राजकीय आघाडीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे.
 

Web Title:  After three states, PM remembers Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.