शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:11 IST

सरकारी नियंत्रणातून झाली मुक्तता, १९५३ मध्ये झाले होते राष्ट्रीयीकरण

नवी दिल्ली : एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली स्थापन केलेल्या विमान कंपनीचे नाव टाटा एअर सर्व्हिसेस होते. या कंपनीला प्रथम टपाल वाहतुकीची परवानगी मिळाली होती. 

जेआरडी टाटा हे निष्णात वैमानिक होते. त्यांनी टपाल घेऊन १५ ऑक्टोबर १९३२ टाटा एअर सर्व्हिसच्या विमानाचे स्वत: पहिले उड्डाण कराची ते मुंबई या मार्गावर केले. १९३८मध्ये या कंपनीचे नाव टाटा एअरलाईन्स ठेवण्यात आले. त्यानंतर १९४६ मध्ये या कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

स्थापना : १९३२n    संस्थापक : जहांगीर रतनजी दादाभॉय (जेआरडी) n    टाटा सन्सचा विमान वाहतूक विभाग एअर इंडिया रूपात सूचीबद्ध : १९४६ n    पहिले उड्डाण युरोपसाठीn    एअर इंडिया इंटरनॅशनल सेवा : १९४८ n    ही सेवा सार्वजनिक - खासगी भागीदारीपैकी एक होती, ज्यात ४९ टक्के सरकार, २५ टक्के टाटा आणि उर्वरित लोकांच्या ताब्यात होती.n    एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण : १९५३ त्यानंतर पुढील चार दशके भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रावर एअर इंडियाने राज्य केले.

n    १९९४-९५ मध्ये खासगी कंपन्यांसाठी विमान वाहतूक क्षेत्र सुरू झाल्याने एअर इंडियाचा हिस्सा कमी होऊ लागला.n    एप्रिल २०२१ : सरकारने एअर इंडियासाठी आर्थिक निविदा मागविण्यास सुरुवात केली. n    सप्टेंबर २०२१ : टाटा समूह, स्पाईस जेटचे प्रवर्तक अजय सिंग यांनी आर्थिक बोली लावली.n    ८ ऑक्टोबर २०२१ : सरकारने जाहीर केले की, टाटा समूहाने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली यशस्वीपणे लावली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाRatan Tataरतन टाटा