शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
5
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
6
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
7
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
8
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
9
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
10
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
13
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
14
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
15
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
16
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
17
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
18
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
19
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
20
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:19 IST

BJP News: यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटलं आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटलं आहे. राज्यसभेमधील भाजपाचे चार नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले. त्याबरोबरच वरिष्ठ सभागृहात भाजपाचं संख्याबळ घटून ८६ वर तर एनडीएचं संख्याबळ १०१ पर्यंत खाली आलं. दरम्यान, १९ जागा रिक्त झाल्याने सद्यस्थितीत राज्यसभेतील खासदारांची संख्या २२६ एवढी झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये कामकाज चालवताना सत्ताधारी भाजपासमोरील अडचणी वाढणार का? संख्याबळ कमी झाल्याने एनडीएचं नुकसान होणार का? प्रमुख कायदे पारित करण्यासाठी एनडीएकडे पुरेसं संख्याबळ आहे की नाही, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

मात्र संख्याबळ घटलं असलं तरी राज्यसभेमध्ये भाजपा अजूनही भक्कम स्थितीत आहे. तसेच सभागृहातील नंबर गेममध्येही अजूनही भाजपा पुढे आहे. एनडीएकडे अजूनही सात बिगरराजकीय नियुक्त सदस्य, २ अपक्ष आणि एआएडीएमके आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महत्त्वाची विधेयके आणि कायदे मंजूर करून घेण्याइतपत संख्याबळ एनडीएकडे आहे. मात्र इतर पक्षांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भाजपाला नियुक्त सदस्यांची पदं लवकरात लवकर भरावी लागतील.  

सध्या राज्यसभेमधील राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे चार नियुक्त सदस्य निवृत्त झाले आहेत. राज्यसभेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर या चारही सदस्यांनी भाजपाचं सदस्यत्व घेतलं होतं. नियुक्त खासदारांमधील आणखी एक सदस्य गुलाम अली हे आहेत. ते २०२८ मध्ये निवृत्त  होतील. सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नियुक्ती करतात. सध्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी ७ सदस्यांनी स्वत:ला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवलं आहे. मात्र सभागृहात कायदे पारित करताना ते सरकारला साथ देतात. 

सध्याच्या काळात राज्यसभेमध्ये १९ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि राष्ट्रपतींकडून नियुक्त होणाऱ्या प्रत्येकी ४ आणि आठ वेगवेगळ्या राज्यांमधील ११ जागा रिक्त झालेल्या आहेत. या ११ जागांपैकी १० जागा ह्या लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त झाल्या आहेत. तर बीआरएसचे खासदार केशव राव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. आता येणाऱ्या काळात ११ जागांवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएला ८ जागा तर इंडिया आघाडीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला तेलंगाणामध्ये १ जागा मिळेल. त्यामुळे त्यांची सदस्यसंख्या २७ पर्यंत पोहोचेल. मात्र भाजपाला राज्यसभेमध्ये महत्त्वाची विधेयकं पारित करण्यासाठी भाजपाला अडचणी येण्याची शक्यता फार कमी आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी