तुमकूरू - कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचेआमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले.उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आरएसएसचे गीत गायले होते. त्याच धर्तीवर रंगनाथ यांनी तुमकूरू जिल्ह्यातील कुनीगल येथे पत्रकारांशी बोलताना ‘नमस्ते सदा वत्सले’या गीताच्या सुरुवातीच्या ओळी गायल्या.
आमची पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि चांगल्या गोष्टी कुणाकडूनही स्वीकारल्या पाहिजेत, असे रंगनाथ म्हणाले. भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले, उजव्या विचारसरणीचे लोक जात-धर्माचे भेद निर्माण करण्यावर भर देतात, त्याला आम्ही विरोध करतो. त्यांची विचारसरणी आमच्याशी कधीच जुळू शकत नाही. पण कुणी आरएसएसचे गीत गायले तर त्यात काय चुकीचे आहे?