शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

शिवसेनेनंतर आता एआयएडीएमके पक्षामध्ये फूट, कार्यालयातच दोन गटात हाणामारी, एकमेकांची डोकी फोडली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:32 PM

AIADMK Politics: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे.

चेन्नई -  तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे. दरम्यान, ओ. पनीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाची चौकट तयार करण्यासाठी जनरल कौन्सिलच्या बैठकीला मान्यता दिली आहे. यादरम्यान, चेन्नईत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम गटात हाणामारी झाली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

हायकोर्टाने ओपीएस यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून बोलावलेल्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.  ही बैठक आज सकाळी ९ वाजता सुरू होणार होती. तत्पूर्वी ९ वाजता कोर्टाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार बैठक झाली.

दरम्यान, चेन्नईमध्ये  पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम गटात हाणामारी झाली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. जनरल कौन्सिलच्या बैठकीपूर्वी पनीरसेल्वम यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयाचा दरवाजा तोडला. समर्थक लाठ्या काठ्या घेऊन ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी केली. सध्या पक्षात सिंगल लीडरशिप लागू करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या पाठिराख्यांमधील लढाई हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.   

टॅग्स :All India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण