हायव्होल्टेज ड्रामा! पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; चपलेने धू धू धुतलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:33 IST2023-06-05T16:32:37+5:302023-06-05T16:33:15+5:30
प्रेमजीत साव असं या व्य़क्तीचं नाव असून दोनदा लग्न करणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं.

फोटो - झी न्यूज
नवऱ्यासाठी दोन बायकांनी जोरदार भांडण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमजीत साव असं या व्य़क्तीचं नाव असून दोनदा लग्न करणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. दोन लग्न केल्याच्या कारणावरून प्रेमजीत साव याला त्याच्याच पत्नीने बिहारच्या शरीफ सदर रुग्णालयात बेदम मारहाण केली.
बिहार शरीफ सदर रुग्णालयात सुमारे तासभर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. विशेष म्हणजे, प्रेमजीत सावने दोनदा लग्न केलं आहे. पहिल्या पत्नीचे नाव जुली कुमारी आहे तर दुसरी पत्नी अनिशा कुमारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमजीत आपली दुसरी पत्नी अनिशा कुमारीची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात आला होता. याच दरम्यान, पहिली पत्नी जुली देवीही बिहार शरीफ सदर रुग्णालयात पोहोचली.
पहिली पत्नी सांगते की, तिने 10 वर्षांपूर्वी प्रेमजीत सावशी लग्न केलं होतं, त्यांना 2 मुलं देखील आहेत. दुसरीकडे, पती प्रेमजीत साव म्हणतो की, जुली कुमारीच्या छळामुळे त्याने नवादा येथे राहणाऱ्या अनिशा कुमारीसोबत दुसरे लग्न केलं आहे. आता दोन्ही पत्नींना प्रेमजीत सावसोबत राहायचं आहे. याच वादातून बिहारच्या शरीफ सदर रुग्णालयात पहिली पत्नी जुली देवी हिने पती प्रेमजीत सावला बेदम मारहाण केली. तेथे उपस्थित लोकांनी मध्यस्थी केल्यावर प्रकरण शांत झाले.
मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दोघेही रस्त्यात एकमेकांशी कसे भांडले हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पहिली पत्नी पतीला मारहाण करण्यासाठी जवळ आली तेव्हा दुसरी पत्नी त्या उभी राहिली आणि नंतर स्वतःच पहिल्या पत्नीशी भांडण केलं. रस्त्याच्या मधोमध बराच वेळ गोंधळ सुरू होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.