शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! दिल्लीत जोडप्याला लुटताच मिळाले २० रूपये; चोरटे भावुक, १०० रूपये देऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 12:45 IST

देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरटे निर्भयपणे खून, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, महागड्या वस्तू हिसकावून घेण्यासारख्या घटना करत आहेत. ही लूटमार करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी २ चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ३० मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेजही सापडले आहे.

पिस्तुल दाखवून जोडप्याला लुटलेसीसीटीव्ही फुटेजमध्ये एका जोडप्याला पिस्तुल दाखवून लुटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरं तर या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जोडप्याकडे केवळ २० रूपये सापडले. त्यानंतर चोरट्यांनी या जोडप्याला १०० रुपये देऊन तिथून पळ काढला. देव आणि हर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.  

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, २१ जून रोजी सलग तीन फोन आले. पहिल्या कॉलमध्येच एका जोडप्याचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुसऱ्या कॉलवरून एका व्यक्तीकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. तिसऱ्या कॉलवरून पिस्तुल दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. पण तिन्ही कॉल वेगवेगळ्या लोकांनी केले होते. तिसरा कॉल आला त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मग संशयिताकडे पिस्तुल असल्याचे आढळून आले. दरोडेखोरांनी एका जोडप्याकडून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असता ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. यावरून चोरट्यांनी जोडप्याचा खूप अपमान केला अन् त्यांनी १०० रूपये देऊन तिथून पळ काढला. तपासाअंती चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. 

आरोपी देव आणि हर्ष यांना अटकहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि गुन्हेगारांचा माग काढण्याचे काम केले. जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना इतरही अनेक ठिकाणी लूटमार केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस या दरोडेखोरांचा माग काढत जगतपुरी येथे पोहोचले आणि ३१ वर्षीय हर्ष राजपूत याला अटक केली मग देवचा शोध लागला.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीtheftचोरीPoliceपोलिसArrestअटकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट