शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:45 IST

काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला भाजपाने लगावला.

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी देशाबाहेर केलेल्या विधानावरून संसदेत गदारोळ माजलेला असताना रविवारी काँग्रेसनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. काँग्रेसनं रविवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून "सावरकर समझा क्या..नाम राहुल गांधी है" असं ट्विट केले. पोलीस चौकशीनंतर राहुल त्यांच्या घरी जाताना स्वत: कार चालवत गेले तेव्हाचा फोटो पोस्ट करत त्यावर कॅप्शन दिले आहे. 

काँग्रेसच्या या ट्विटवरून भाजपा नेते आणि विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, कृपया महान आत्मा वीर सावरकर यांचा अपमान नका करू. हात जोडून विनंती करत आहे. मनुष्याची चारित्र्याची महानता तोच जाणू शकतो ज्याने त्यागाची किंमत जाणली आहे. तर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी लोकशाहीची सर्व मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस पक्ष मानसिक आजाराने ग्रस्त आहे. काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला. त्याचसोबत भाजपा विचारधारा असणारी पार्टी आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वावर भाजपा पुढे जात आहे असंही जे पी नड्डा यांनी म्हटलं. 

दरम्यान, अदानीवर संकट आल्यानंतर राहुल गांधींविरोधात तपास सुरू होतो. अदानींना वाचवण्यासाठी सगळा खेळ खेळला जातो. मालकाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात उतरले आहे. आम्ही अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारले त्यामुळे हुकुमशाह सरकारने पोलीस पाठवले. त्यांना वाटले आम्ही घाबरू. माफी मागू. परंतु हे सहन करणार नाही. आम्ही सावरकर भक्त नाही. बापूंचे अनुयायी आहे. ना घाबरणार, ना हरणार आणि आम्हीच जिंकणार असं काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या अखेरच्या दिवशी आजही महिलांचे शोषण होत आहे असं विधान केले होते. त्यावरून दिल्ली पोलिसांनी १६ मार्चला राहुल गांधींना नोटीस पाठवून ती महिला कोण? ज्याने हे सांगितले असं उत्तर मागितले आहे. राहुल गांधींनी महिलेची डिटेल्स दिल्ली पोलिसांना दिली. राहुल गांधींच्या याच विधानाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचली होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर