मोदींच्या गळाभेटीनंतर पाकिस्तानची मुजोरी वाढली

By Admin | Updated: July 23, 2014 04:20 IST2014-07-23T04:20:25+5:302014-07-23T04:20:25+5:30

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर तब्बल 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

After Modi's assault, Pakistan's insensitivity grew | मोदींच्या गळाभेटीनंतर पाकिस्तानची मुजोरी वाढली

मोदींच्या गळाभेटीनंतर पाकिस्तानची मुजोरी वाढली

19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन : सरकारने नांगी टाकल्याची टीका
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर तब्बल 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राज्यसभेत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीच ही माहिती दिल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या दुर्बलतेचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनापुढे नांगी का टाकली आहे, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला विचारला आहे. पंतप्रधानपदी आरूढ होण्यापूर्वी नरेंद्र मोदी तत्कालीन संपुआ सरकारवर दुर्बल असल्याचा आरोप करीत होते, याचा संदर्भ देत आझाद यांनी सरकारला धारेवर धरले. 
  दिल्लीतील शपथविधी समारंभाला नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना सन्मानाने बोलाविले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सीमेवरील शांततेच्या मुद्दय़ावर भरही दिला होता. पण या गळाभेटीनंतरही पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सरहद्दीवर 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. किंबहुना ही चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानने नव्याने आगळीक केल्याचे व त्यात एक भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त येऊन थडकले. 
 
आम्ही कोणापुढे झुकलेलो नाही; आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले त्या प्रत्येक वेळी भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
- अरुण जेटली, 
संरक्षणमंत्री
 
च्राजकुमार धूत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी सांगितले की, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांचा मुद्दा ठरावीक प्रक्रियेनुसार हॉटलाइन 
व्यवस्था, फ्लॅग मिटिंग आदींच्या माध्यमाने पाकिस्तानपुढे उपस्थित 
केला जात असतो.
च्27 मे रोजी मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या 
भेटीतही सीमेवरील शस्त्रसंधीवर 
भर दिला होता. 
 
च्जम्मू- जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये मंगळवारी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करीत असलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. 
च्दुस:या एका घटनेत कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना एका घुसखोरास कंठस्नान घातले. 
च्अखनूर तहसीलच्या पल्लनवाला सेक्टरमधील चकला चौकीजवळ दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. 
 
19 प्रत्यक्षात  26 मे ते 17 जुलै या कालावधीत 19 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केला आहे. 
 
54 या वर्षी 17 जुलैर्पयत जम्मू-काश्मीरची नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 54 घटना घडल्या आहेत.  
 
पाकने जुलै महिन्यात 
भारतीय सैन्यावर गोळीबार केला. 1, 12 आणि 16 जुलै रोजी पाकने जम्मू सीमेवर गोळीबार केला; तर 17 जुलै रोजी अरनिया भागातील पीतळ पोस्टवर हल्ला चढविला. 
 
200वेळा पाकने गेल्या वर्षभरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, त्यात भारताचे 12 जवान शहीद झाले तर 14 जखमी झाले. 

 

Web Title: After Modi's assault, Pakistan's insensitivity grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.