शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर नितीश कुमारांनी काँग्रेसला दिला धक्का, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:54 IST

Nitish Kumar News: आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वादविवादांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेदरम्यानच इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्का देत आहेत.

आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वादविवादांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेदरम्यानच इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्का देत आहेत. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या या यात्रेस सहभागी होणार नसल्याचे सांगत स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची घोषणा केली होती. तर भगवंत मान यांनीही पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही काँग्रेसला धक्का दिला आहे. नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे.

सध्या बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या बातम्या वरचेवर येत आहेत. नितीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्ष असलेल्या आरजेडीपासून अंतर ठेवून वागण्यास सुरुवात केली आहे. तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न सन्मान देण्याची घोषणा झाल्यानंतर नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर टीका केली होती. त्यामधून नितीश कुमार यांनी लालूंच्या आरजेडीपासून आपण दुरावत असल्याचे संकेत दिले होते. आता नितीश कुमार यांनी भारत जोडो न्याय यात्रेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने ते इंडिया आघाडीपासून दूर होत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आपला वेगळा मार्ग निवडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यामध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या जयंती समारंभामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले होते की, कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या कुटुंबाला राजकारणात पुढे आणलं नाही. मात्र आजकाल काही लोक  केवळ आपल्या कुटुंबाला पुढे आणत आहेत. नितीश कुमार यांनी यावेळी कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र राजकारणात वाढत असलेल्या घराणेशाहीला आक्रमकपणे लक्ष्य केले. यावेळी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्याबद्दल नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस