शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शिमल्यात मंदिरावर दरड कोसळली, 25-30 लोक ढिगाऱ्याखाली; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:48 PM

मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले असून यात दोन लगान मुलांचाही समावेश आहे.

हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणांवरून जीवीतहामीचे वृत्त येत आहे. सोलनमध्ये भूस्खलनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत. राजधानी शिमला येथेही भूस्खलनामुळे मोठी दूर्घटना घडली आहे. येथील समरहिलमधील शिव मंदिरावर दरड कोसळली आहे. या घटनेत किमान २५-३० लोक ढिगाऱ्याखाली दबले असून 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे.

समरहिल येथील घटनेत प्राचीन शिव बाडी मंदिर उध्वस्त झाले आहे. या दूर्घटनेत जवळपास दोन डझन लोक दबल्याची शक्यता आहे. यात एक कुटुंबातील सात लोकांचा समावेश आहे. मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले असून यात दोन लगान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय पाच जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. शिमल्याचे डीसी आदित्य नेगी आणि एसपी संजीव गांधी घटनास्थळी उपस्थित असून रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. हे मंदिर पाहाडाच्या पायथ्याशी आहे. पहाडावरून वारंवार भूस्खलन होत असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. ही भूस्खलनाची घटना सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास घडली. आज सोमवार असल्याने शिव शंकरांच्या मंदिरात भावीक दर्शनासाठी आले होते. याच दरम्यान मंदिरावर दरड कोसळली. शिमल्याचे एसपी संजीव गांधी यांनी म्हटल्यानुसार, घटनास्थळी तीन मृतदेह सापडले आहेत. मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेले आहेत. ते काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशlandslidesभूस्खलनTempleमंदिरDeathमृत्यू