पती पाठोपाठ पत्नीचाही जगाचा निरोप

By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:03+5:302016-02-20T00:07:03+5:30

जळगाव : ईश्वर कॉलनीतील डॉ. रवीकुमार भोकरे यांचे निमोनिया आजाराने निधन झाले, मात्र पतीच्या निधनाचे दु:ख पेलवलं न गेल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने पत्नी वैशाली भोेकरे यांचेही निधन झाले व पती पाठोपाठ जगाचा निरोप घेतला.

After the husband is the wife's message of the world | पती पाठोपाठ पत्नीचाही जगाचा निरोप

पती पाठोपाठ पत्नीचाही जगाचा निरोप

गाव : ईश्वर कॉलनीतील डॉ. रवीकुमार भोकरे यांचे निमोनिया आजाराने निधन झाले, मात्र पतीच्या निधनाचे दु:ख पेलवलं न गेल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने पत्नी वैशाली भोेकरे यांचेही निधन झाले व पती पाठोपाठ जगाचा निरोप घेतला.
डॉ. भोकरे हे आजारी असल्याने ते उपचारासाठी नाशिक येथे मुलगी प्राची धर्माधिकारी यांच्या कडे सपत्नीक गेले होते. तिथे त्यांचे निमोनिया आजाराने २ फेब्रुवारी रात्री १० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी वैशाली भोकरे यांच्या मनावर मोठा आघात झाला. अशातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, आणि त्यांनीही पती नंतर अवघ्या सहा तासातच जगाचा निरोप घेतला.
आई वडिलांचे एकाच दिवशी निधन झाल्याने मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. भोेकरे यांनी जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून ३० वर्ष सेवा दिली होती. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार होत.

Web Title: After the husband is the wife's message of the world