गारपीटग्रस्त भागाच्या दौर्यानंतर राज ठाकरे मुंबईला रवाना
By Admin | Updated: December 14, 2014 23:45 IST2014-12-14T23:29:49+5:302014-12-14T23:45:16+5:30
नाशिक - चार दिवसांच्या दौर्यावर नाशकात आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर दुपारी मुंबईला प्रस्थान केले. येत्या २६ डिसेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौर्यावर येण्याची शक्यता मनसेतील सूत्रांनी बोलून दाखविली.

गारपीटग्रस्त भागाच्या दौर्यानंतर राज ठाकरे मुंबईला रवाना
नाशिक - चार दिवसांच्या दौर्यावर नाशकात आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर दुपारी मुंबईला प्रस्थान केले. येत्या २६ डिसेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौर्यावर येण्याची शक्यता मनसेतील सूत्रांनी बोलून दाखविली.
राज ठाकरे हे शुक्रवारी चार दिवसांच्या दौर्यावर नाशिकला आले होते. पहिल्याच दिवशी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी नियोजित पाहणी दौरा रद्द केला होता. मात्र शनिवारी ठाकरे यांनी गोदापार्कसह शहरातील उद्यानांना भेटी देतानाच उद्योजकांशीही चर्चा केली होती. रविवारी राज ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करत तेथील शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दौरा आटोपून नाशकात परतल्यानंतर राज ठाकरे मात्र यांनी लगेचच मुंबईकडे प्रस्थान केले. राज ठाकरे यांच्या या दौर्यात नाशिक जिल्ातील कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु ठाकरे यांनी त्याबाबत कोणताही निर्णय न घेता पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील उत्सुकता मात्र कायम ठेवली.