शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 18:25 IST

जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू

अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं अज्ञातांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत.

त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना  माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे.

त्रिपुरातील बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर टीका केली. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की त्यांनी पत्रकारांना धमकावू नये. मी आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. भविष्यातही असे व्हिडीओ पोस्ट करेन असं पाराशर बिस्वास यांनी म्हटलं होतं.

पाराशर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका केली होती. शनिवारी काही अज्ञात व्यक्ती पाराशर यांच्या घरात घुसल्या. त्यांनी पाराशर यांना मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाराशर यांना आगरातळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा संशय असल्याचा बंगाली दैनिकाचे संपादक सुबल डे यांनी व्यक्त केला. भाजप प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितलं.फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला; भाजपमधील वादात शिवसेनेची उडीहाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवBJPभाजपा