राष्ट्रीय दर्जा विधानसभेनंतर ठरवा
By Admin | Updated: August 20, 2014 01:00 IST2014-08-20T01:00:33+5:302014-08-20T01:00:33+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन राजकीय पक्षांनी ‘राष्ट्रीय राजकीय पक्ष’ म्हणून आपल्या दर्जाचे निवडणूक आयोगापुढे जोरदार समर्थन केले

राष्ट्रीय दर्जा विधानसभेनंतर ठरवा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन राजकीय पक्षांनी ‘राष्ट्रीय राजकीय पक्ष’ म्हणून आपल्या दर्जाचे निवडणूक आयोगापुढे जोरदार समर्थन केले व येत्या काही महिन्यांत होणा:या चार राज्य विधानसभांच्या निवडणुका उरकेर्पयत ही मान्यता काढून घेण्याच्या मुद्दय़ावर निर्णय घेतला जाऊ नये, अशी विनंती केली.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता तुमचा ‘राष्ट्रीय पक्षाचा दर्जा’ काढून का घेतला जाऊ नये, अशा ‘कारणो दाखवा नोटिसा’ आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व बहुजन समाज पक्षास काढल्या होत्या. त्यावर या पक्षांचे म्हणणो ऐकून घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्यासह अन्य दोन निवडणूक आयुक्तांपुढे मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल पटेल यांनी तर कम्युनिस्ट पक्षातर्फे डी. राजा यांनी वरीलप्रमाणो भूमिका मांडली. बहुजन समाज पक्षातर्फे कोणीही प्रतिनिधी जातीने हजर राहिला नाही. परंतु या पक्षाने आयोगाला याआधीच पत्र पाठवून अशाच आशयाचा पवित्र घेतला असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही, हे डी. राजा यांनी मान्य केले. मात्र हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईर्पयत ‘राष्ट्रीय दर्जा’चा निर्णय लांबणीवर टाकावा, अशी विनंती करताना त्यांनी सांगितले की, यापैकी कोणत्याही राज्यात कम्युनिस्ट पक्षाने चार किंवा त्याहून जास्त जागा जिंकल्या तर पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’ कायम राहू शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करीत असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुका होईर्पयत वाट पाहावी, अशी आपण विनंती केल्याचे पटेल यांनी नंतर सांगितले.
प्रामुख्याने उत्तर प्रदेशात प्रबळ असलेल्या बहुजन समाज पक्षास महाराष्ट्र व हरियामा विधानसभा निवडणुकीतही ब:यापैकी जागा जिंकण्याची खात्री वाटत असल्याने त्यांनीही आयोगास पत्र लिहून अशीच विनंती केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पात्रता निकष व मतांची आकडेवारी
कोणत्याही पक्षास राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी ताज्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन निरनिराळ्य़ा राज्यांमधून लोकसभेच्या किमान दोन टक्के जागांवर (11 जागा) विजयी होणो आवश्यक असते. शिवाय लोकसभेच्या चार जागा जिंकण्याखेरीज लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या एकूण पात्र मतदानापैकी सहा टक्के मते मिळविणारा पक्षही ‘राष्ट्रीय’ दर्जा मिळवू शकतो. ताज्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षास एकूण मतदानाच्या 4.1 टक्के-मते मिळाली खरी पण त्यांना लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. राष्ट्रवादीला एकूण मतदानाच्या 1.6 टक्के मतांसह लोकसभेच्या चार जागा मिळाल्या.