शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 06:20 IST

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो.

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची दुसरी लाट संपल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला जात असताना केरळात तिसऱ्या लाटेच्या निर्मितीची भीती व्यक्त झाली. केरळमध्ये दररोज नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत असताना आता तिकडे निपाह या विषाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बारा वर्षांचा मुलगा या आजाराचा बळी ठरलेला आहे. जाणून घेऊ निपाहविषयी...

निपाह विषाणू काय आहे?निपाह हा प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमित होणारा विषाणू आहे. वटवाघळात या विषाणूचे अंश निर्मित होतात. डुक्कर, कुत्रे आणि घोडे या प्राण्यांनाही निपाहची बाधा होण्याची शक्यता असते. 

निपाहची लक्षणे काय?मेंदूज्वरसतत खोकला येऊन ताप येणे आणि श्वसनात त्रास जाणवणेश्वसननलिकेला सौम्य वा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होणेताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, घशाला सूज येणे, चक्कर येणे काही घटनांमध्ये लोकांना न्युमोनिया होण्याचाही धोका असतो. 

विषाणूने भरलेल्या वटवाघळाचा दंश झालेले फळ खाल्ल्यास किंवा वटवाघळांचा निवास असलेल्या झाडावरून पडलेले दूषित फळ खाण्यात आल्यास बाधा होण्याचा धोका असतो. 

निपाहची बाधा टाळण्यासाठी सातत्याने साबणाने हात धुणे गरजेेचे. बाजारातून आणलेली फळे धुवून खावीत.

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो.ज्यांचा नित्य प्राण्यांशी संबंध येतो त्यांना हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. 

निपाहसाठी औषध वा लस आहे का?nसध्या तरी निपाहवर लस नाही. nरिबाविरिन हे औषध या विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले आहे. मात्र, मानवी चाचण्यांमध्ये अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

निपाहचे निदान कसे केले जाते?nआरटी-पीसीआरच्या माध्यमातून निपाहचे निदान होऊ शकते. nपीसीआर व व्हायरस आयसोलेशन या चाचण्याही केल्या जातात.

आतापर्यंत कुठे फैलाव झाला?nमलेशिया, सिंगापूर, बांगलादेश आणि भारत या देशांमध्ये आतापर्यंत निपाहचा फैलाव झाला आहे. n२०१८ मध्ये निपाहने केरळमध्ये कहर केला होता.

 

 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूcorona virusकोरोना वायरस बातम्या