बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:47 IST2025-07-25T11:46:18+5:302025-07-25T11:47:28+5:30
Election Commission SIR order:

बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांच्या यादीचे पुनर्रीक्षण केले जात आहे. महाराष्ट्रातही बनावट मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचे काँग्रेसने समोर आणले होते. हरियाणा, दिल्लीतही तसेच आरोप करण्यात आले होते. यामुळे निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच राज्यांच्या मतदार याद्यांचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
मतदार याद्यांच्या SIR बाबतच्या २४ जूनच्या आदेशात निवडणूक आयोगाने देशभरात ही मोहिम राबविली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मतदार यादीची अखंडता जपण्यासाठी त्यांच्या संवैधानिक आदेशानुसार आयोगाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मतदार यादीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याची त्यांची संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यासाठी देशभरात SIR सुरू केले जाईल.
बिहारमधील विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांना या प्रक्रियेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे, तसेच या मतदारांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
स्पेशल इंटेंसिव रिवीजनचा फायदा काय...
मृत मतदार, कायमचे स्थलांतरित मतदार, दोन ठिकाणी मते नोंदवलेले मतदार, बनावट मतदार किंवा परदेशी मतदार यांची माहिती निवडणूक आयोगाला मिळणार आहे. तसेच बोगस मतदार नोंदणी देखील पकडली जाणार आहे. याचा फायदा निवडणुकीवेळी होणार आहे. बोगस मतदानामुळे ज्या पक्षाच्या उमेदवाराने किंवा समुहाने हे केले आहे त्यांचा फायदा होता होता. त्यांचा उमेदवार जिंकत होता.