भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी नुकत्याच झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि मोठा दावा केला आहे. वार्षिक 'एअर फोर्स डे' पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' ही या वर्षातील सर्वात महत्त्वाची लष्करी कारवाई होती आणि यात भारताने पाकिस्तानचे पाच लढाऊ विमानं यशस्वीरित्या पाडली आहेत. आशिया चषकामध्ये भारत पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताची विमाने पाडल्याचे खुनावले होते. तर भारतानेही नंतरच्या सामन्यात पाडली नाहीत तर पुन्हा सुखरूप आल्याचे दाखविले होते.
सिंग यांनी स्पष्ट केले की, पाडलेल्या विमानांमध्ये पाच F-16 आणि JF-17 विमानांचा समावेश होता. "शत्रूच्या हद्दीत ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर केलेले आमचे हल्ले आणि अचूक मारक क्षमता यामुळे पाकिस्तानचे रडार, कमांड सेंटर्स आणि हवाई तळ यांचे मोठे नुकसान झाले.
'सुदर्शन चक्र' प्रणालीचा समन्वय
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचे मुख्य कारण भारतीय सशस्त्र दलांमधील उत्कृष्ट समन्वय होते. 'ऑपरेशन सिंदूर' हे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या 'त्रिशक्ती'च्या समन्वयाचे प्रतीक होते. तिन्ही दलांनी एकत्रितपणे 'सुदर्शन चक्र' हवाई संरक्षण प्रणालीवर काम करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे भारताची हवाई सुरक्षा क्षमता अभूतपूर्व स्तरावर पोहोचली आहे, असे सिंग म्हणाले.
"आमच्याकडे एक अवॉक्स (AWACS) आणि चार ते पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडल्याचे ठोस पुरावे आहेत. भारतीय सशस्त्र दलांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. अत्यंत स्पष्ट उद्देशाने सुरू केलेले हे युद्ध कोणत्याही प्रकारे न वाढवता लवकरच समाप्त करण्यात आले. हा इतिहासामध्ये नोंदवला जाणारा एक महत्त्वाचा धडा आहे.", असे त्यांना सांगितले.
Web Summary : Air Chief Marshal claims 'Operation Sindoor' saw India down five Pakistani warplanes, including F-16s and JF-17s. Strikes severely damaged Pakistani radar and airbases. The operation highlighted coordinated efforts between the Indian Army, Navy, and Air Force.
Web Summary : एयर चीफ मार्शल ने दावा किया कि 'ऑपरेशन सिंदूर' में भारत ने पाँच पाकिस्तानी युद्धक विमानों को गिराया, जिनमें F-16 और JF-17 शामिल थे। हमलों से पाकिस्तानी रडार और एयरबेस को भारी नुकसान हुआ। ऑपरेशन में सेना, नौसेना और वायु सेना का समन्वय दिखा।