शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

"...सो तस फल चाखा"! केजरीवालांच्या अटकेनंतर, त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांचे ट्विट चर्चेत, असं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:08 PM

या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते.

दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ईडीने गुरुवारी 10वे समन बजावत केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर त्यांचे जुने सहकारी आम आदमी पार्टीचे माजी नेते तथा कवी कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यंच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.

कुमार विश्वा यांची पोस्ट - केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर, कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X)वर "कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥" या गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. या चौपाईच्या माध्यममाने गोस्वामी तुलसीदास कर्माचे महत्व विशद करतात. "हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते." असा या चौपाईचा अर्थ आहे. या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते.

केजरीवालांना केव्हा-केव्हा पाठवलं गेलं समन - - पहिले 02 नोव्हेंबर, 2023- दुसरे 18 डिसेंबर, 2023- तिसरे 03 जेनेवारी, 2024- चौथे 18 जानेवारी, 2024- पाचवे 02 फेब्रुवारी, 2024- सहावे 19 फेब्रुवारी, 2024- सातवे 26 फेब्रुवारी, 2024- आठवे 04 मार्च 2024- नववे 17 मार्च 2024

केजरीवाल असे अडकले -मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण