शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:05 IST

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. 

नवी दिल्ली: भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनीजवळ तैमूर नगरमध्ये ही इमारत कोसळली. येथील गुरूद्वाराजवळ सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. 

यापूर्वी भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.  या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आणखी सात ते आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून बचावकार्य राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ढिगा-याखालून आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वस्तीकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. 

जखमींची संख्याIGM हॉस्पिटल1)  आसिफ याकूब खान ( 19वर्ष ) 2) याकूर युसुफ खान ( 58 वर्ष )3) शकील  अन्सारी ( 37 वर्ष )

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 1) सलमा अन्सारी  ( 45 वर्ष )   2) रेहान खान ( 7 वर्ष )3)ख्वाजा मेहमूद सय्यद ( 55 वर्ष )4) अबिद खान ( 21 वर्ष )

मृत व्यक्तीचे नाव1) रुखसार याकूब खान  (18 वर्ष )

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाNew Delhiनवी दिल्ली