अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30

अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

After 25 years, the offer for compensation | अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

ेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव
संघर्ष न्यायासाठी : मनपाचा असा हा निर्दयीपणा
औरंगाबाद : मनपा प्रशासन पुष्पनगरी भूखंड ताब्यात घेण्यासाठी डोळे झाकून सव्वाकोटी रुपयांचा मोबदला देते. मात्र, एखाद्या गरिबाच्या जागेवर २५ वर्षांपासून सुलभ शौचालय बांधून जागामालकाला एक रुपयाही मोबदल्यादाखल देत नाही. जागामालक १९९१ पासून प्रशासनाकडे हेलपाटे मारून थकल्यानंतर २० फेबु्रवारीच्या सभेत मोबदला देण्याचा प्रस्ताव सहायक संचालक नगररचना यांनी सभेसमोर आणला आहे. सर्वसामान्यांना मनपाकडून न्याय मिळण्यासाठी २५ वर्षे लागतात. हे या प्रकरणातून पुढे आले आहे.
मनपाच्या नगर भूमापन क्र. ११३९१ पैकी मोहल्ला फाजलपुरा येथे खाजगी मालमत्तेवर सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. पी.आर. कार्डवर संजय टोणपे यांचे नाव आहे. सार्वजनिक वापरासाठी तेथे २२ वर्षांपासून शौचालय आहे. मनपाने त्या जागेसाठी टोणपे यांना काहीही मोबदला दिलेला नाही. असे नगररचना विभागाने प्रस्तावात म्हटले आहे. २०१५ या वर्षीच्या आर.आर. रेटनुसार टोणपे यांना मोबदला द्यावा लागणार आहे, असे नगररचना विभागाने प्रस्तावात म्हटले आहे.

१९९१ पासून पाठपुरावा
संजय टोणपे हे मनपाकडून मोबदला मिळावा यासाठी १९९१ पासून पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. आजवर मनपाने त्यांची जागा फुकटात वापरली. माजी महापौर अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात त्यांना मोबदला देण्याप्रकरणी संचिका तयार झाली. त्यानंतर महापौर कला ओझा यांच्या काळात त्यांना मोबदला मिळतो आहे. एखाद्या प्रकरणात जर अर्थकारण दडलेले असेल आणि त्यातून सर्वांचा फायदा होणार असेल तर तसे प्रस्ताव पारित करून त्याचा ठराव होतो; परंतु एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला मोबदला मिळण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागतो. यातून मनपाची मानसिकता कशी आहे, हे लक्षात येते.

Web Title: After 25 years, the offer for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.