शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

100 वर्षांनंतर देवाचे घर झाले सर्वांसाठी खुले! दलित समाजाला मंदिरात मिळाला पूजेसाठी प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:43 IST

तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला.

तिरुवन्नमलाई : देवाचे घर सर्वांसाठी कायम खुले असते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला तामिळनाडूतमंदिरात प्रवेश मिळत नव्हता. अखेर त्यांना लढा यशस्वी झाला आहे.

तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला. दलितांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दलितांनी सांगितले की, देवघरात प्रवेश झाल्याने खूप आनंद झाला आहे.

यावेळी इतर समाजातील लोकांनी दलितांच्या मंदिरात प्रवेशाला विरोध केला नाही. या आंदोलनाची सुरुवात जुलै महिन्यात मंदिर प्रवेशावरून दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून झाली होती. या दरम्यान दलित आणि वन्नियार यांच्यात अनेक हाणामाऱ्या झाल्या होत्या. 

दोन तरुणांपैकी एक दलित, तर दुसरा वन्नियार समाजाचा होता. दोघेही एकाच शाळेत शिकले आणि नोकरीसाठी चेन्नईला गेले होते. दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सर्वप्रथम समाजमाध्यमांवर वाद घातला. नंतर गावात दोघांमध्ये भांडण झाले.

हवे ते सर्व मिळते...चेल्लनकुप्पम गावात, बहुतेक नवविवाहित जोडपे मंदिरात प्रार्थना करतात आणि पोंगल शिजवतात. यामुळे त्यांना हवे ते सर्व मिळते, असे मानले जाते. मंदिर प्रवेशामुळे आज आम्ही आनंदी आहोत, असे एका महिलेने सांगितले.

आतापर्यंत काय करत होते? - तरुणांमध्ये झालेल्या भांडणानंतर दलित समाजातील व्यक्तींनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी मंदिरात प्रवेश करू देण्याची विनंती केली. यानंतर, दलितांनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. - वेल्लोर रेंजचे डीआयजी एम.एस. मुथुसामी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता. आतापर्यंत दलित समाज कलियाम्मल मंदिरात पूजा करत होते. हे मंदिर ३० वर्षांपूर्वी दलित समाजाने बांधले आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTempleमंदिर