शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

Afghanistan: 'ती' अमेरिकन शस्त्रास्त्रे पाकमार्गे भारतात तस्करीचा धोका; लष्कराची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 06:00 IST

तालिबानचा अफगाणिस्तानच्या सैन्याने कुठेही प्रतिकार केला नाही. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर शस्त्रसाठा तालिबानच्या हाती लागला. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे सहज मिळू लागली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघारीला सुरुवात करताच तालिबानने एकेक भूभाग काबीज करायला सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सैन्याला अमेरिकेने दिलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. या शस्त्रांद्वारे सर्वप्रथम तालिबान पाकिस्तानात हैदोस घालेल. त्यानंतर शस्त्रस्त्रांची भारतात तस्करी होण्याची भीती भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

तालिबानचा अफगाणिस्तानच्या सैन्याने कुठेही प्रतिकार केला नाही. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर शस्त्रसाठा तालिबानच्या हाती लागला. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे सहज मिळू लागली आहेत. 

तालिबान्यांनी सुमारे ५ लाख एम-१६ आणि एम-४ रायफल्स लुटल्या आहेत. याशिवाय अमेरिकन लाईट मशीनगन आणि शस्त्रसज्ज वाहनांवरील ५० कॅलिबरर शस्त्रास्त्रांचाही त्यात समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर स्नायपर रायफल्स, स्टीलच्या गोळ्या, बुलेटप्रूफ जॅकेट्स तालिबानच्या हाती लागले आहे. तसेच हमवीससह २ हजारांहून अधिक सशस्त्र वाहने, यूएच-४० ब्लॅक हॉक विमाने, सशस्त्र हेलिकॉप्टर्स आणि स्कॅनइगल ड्रोन विमानेदेखील पाकिस्तानला मिळू शकतात. या शस्त्रास्त्रांचा आधी पाकिस्तानमध्ये वापर होऊ शकतो. त्यानंतर दहशतवादी ती भारतात वापरण्याचा धोका आहे.

भारतीय लष्करही सज्ज

शस्त्रांचा वापर करून काश्मीरच्या खोऱ्यात घातपाती कारवाया केल्यास भारतीय लष्कर सज्ज असल्याचे लष्कारातील सूत्रांनी सांगितले. तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने ९० च्या दशकाप्रमाणे थारा दिल्यास त्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

‘अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही’ काबूल :  पंजशीर खोरे ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी कडक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला स्पष्टपणे बजावले आहे. अफगाण नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत हे शक्य नाही आणि आम्ही दडपशाही सहन करणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला बजावले आहे. तालिबानने पंजशीरमधील भाग ताब्यात घेतल्याचे वृत्तही सालेह यांनी फेटाळले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी