शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; थोड्याच वेळात आदेश निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 10:58 IST

अफगाणिस्तानातील भारतीयांची सुटका करण्यासाठी मोदी सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत

काबुल: अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबाननं दिली आहे. मात्र भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियानं दोन विमानं स्टँडबायवर ठेवली आहेत. केंद्राचे आदेश मिळताच ही विमानं दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे.अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दोन विमानं सज्ज ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारकडून एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत. काबुलच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज असलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काबुलमधील हमीद करझाई आंततराष्ट्रीय विमानतळावरून होत असलेली हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. 

'काबुलमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत,' असं एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे रात्रीपासून हवाई वाहतूक बंद आहे. एअर इंडियाचं एक विमान दररोज काबुलसाठी उड्डाण करतं. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान