तेलंगणचे हवाई सर्वेक्षण लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:06+5:302015-09-16T23:38:06+5:30

लवकरच भूमीपूजन : प्राणहिता-गोदावरीच्या वाया पाण्याचा होणार वापर

Aeronautical survey of Telangana for small project | तेलंगणचे हवाई सर्वेक्षण लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी

तेलंगणचे हवाई सर्वेक्षण लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी

करच भूमीपूजन : प्राणहिता-गोदावरीच्या वाया पाण्याचा होणार वापर
सिरोंचा (गडचिरोली) : लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तेलंगण राज्याने ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत हवाई सर्वेक्षण केले. सध्या हे सर्वेक्षण प्राथमिक अवस्थेत असून ते अंतिम टप्प्यात आले की अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होईल. मात्र येत्या एक ते दीड महिन्यात तेलंगणचे मुख्यमंत्री कलवकुंटला चंद्रशेखर राव प्रस्तावित प्रकल्पस्थळी कोनशीला न्यास करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
मागील चार दिवसांचे हवाई सर्वेक्षण तेलंगण राज्यातील अंबडपल्ली-मेडीगड्डा लिप्ट इरिगेशन प्रोजेक्टसाठी झाले. या प्रकल्पामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाण्याला नुकसान होणार नाही. या प्रकल्पांतर्गत केवळ पावसाळ्यात वाया जाणारे गढूळ पाणी संकलित होणार आहे. त्यावर आवश्यक प्रक्रिया करून पेयजल व कृषी सिंचन असा दुहेरी हेतू साध्य होणार आहेे.
प्राणहिता व गोदावरीचे पावसाळ्यातील पाणी राजमुद्रीजवळ अरबी समुद्रात विलीन होते. या दोन्ही नद्यांचा आजतागायत सिरोंचा तालुक्यासह नजीकच्या तालुक्यांना कृषी सिंचनासाठी कवडीचाही उपयोग झाला नाही. उलट पूर आणि महापुरामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी)
-----
गोदावरी पाणी तंटा लवाद १९८० च्या परिशिष्ट अहवालातील परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट केलेले लेंडी प्रकल्प, लोअर पैनगंगा प्रकल्प आणि प्राणहिता प्रकल्प या तीन सिंचन प्रकल्पांची कामे संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्याचे आंध्र व महाराष्ट्र शासनाने ठरविले होते. तेलंगण राज्य तेव्हा अस्तित्वात नव्हते. लेंडी प्रकल्प व लोअर पैनगंगा प्रकल्पासंबंधित आंतरराज्यीय मुद्दे उभय राज्यांकडून चर्चेद्वारे कार्यान्वित करण्यात आले.
प्राणहिता प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी अन्वेषण व सर्वेक्षण केले जाणार होते. हे सर्वेक्षण त्वरित व जलद गतीने सुरू करणे दोन्ही राज्यांना किफायतशीर ठरेल असे सांगण्यात आले होते. आंध्र शासनाने २००८ मध्ये त्या दृष्टीने पाऊल उचलले.

Web Title: Aeronautical survey of Telangana for small project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.