शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले, "आम्ही सहमत नाही"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 14:31 IST

शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला सुनावले खडेबोलकृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?, सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. "कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?", असा सवाल करत न्यायालयानं केंद्र सरकारला झापलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्राच्या केलेल्या कानउडणीमुळे शेतकरी नेते खुश असले तरी समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलं."जर सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायदे स्थगित करण्यावर कोणताही निर्णय दिला तर त्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करण्यावर विचार करू. आमचं आंदोलन शांततामय वातावरणात सुरू आहे आणि ते तसंच सुरू राहिलं. सरकारनं लोकशाही पद्धतीनं आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे," असंही पन्नू म्हणाले. त्यांनी आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "आम्हाला हे आंदोलन संपवायचं नाहीये. तुम्ही ते सुरू ठेवू शकता. परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचंय की जर कायद्यावर स्थगिती आणली तर जोवर अहवाल येत नाही तोवर तुम्ही आंदोलनाची जागा बदलणार का? जर काहीही यात चुकीचं झालं तर याचे जबाबदार आपण सर्व असू," असं सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितलं. "जर शेतकरी आंदोलन करत आहेत तर एक समितीनं त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं असं आम्हाला वाटत आहे. आम्ही कोणालाही आंदोलन करण्यापासून मनाई करत नाही. परंतु आम्ही कोणाच्या बाजूनं आहोत किंवा कोणाच्या विरोधात ही टीका आम्हाला नको," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाची नाराजी सर्वोच्च न्यायालयात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली. शेतकऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक झाली असून यात चर्चा यापुढेही सुरू राहील असं ठरविण्यात आल्याचं केंद्र सरकारनं यावेळी न्यायालयासमोर म्हटलं. सरकारच्या या भूमिकेवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. "केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन ज्यापद्धतीने हाताळत आहे, त्यावर आम्ही नाखूश आहोत. तुम्ही कायदा संमत करण्याआधी काय केलं? ते आम्हाला माहित नाही. मागील सुनावणीवेळीही चर्चा सुरू आहे असंच सांगण्यात आलं. पण त्यापुढे काही झालेलं दिसत नाही", असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे."कृषी कायद्यांचं कौतुक करणारी कोणतीही घटना आमच्याकडे आलेली नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञ मंडळी नाही. पण तुम्ही या कायद्यांना स्थगिती देणार आहात की आम्हाला यासाठीची पावलं उचलावी लागतील? कारण परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. आंदोलकांचा मृत्यू होत आहे. तरीही ते गारठणाऱ्या थंडीत तसेच बसून आहेत. त्यांच्या जेवण्याच्या आणि पाण्याची काळजी कोण घेणार?", असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय