शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणींना फुटला कंठ

By admin | Updated: June 20, 2015 10:25 IST

‘राजकारणात एक आठवडा हा मोठा कालावधी असतो, या आठ दिवसात प्रचंड मोठी उलथापालथ घडू शकते’, असे म्हटले जाते. मोदी सरकारला याचा अनुभव सध्या येत आहे.

‘राजकारणात एक आठवडा हा मोठा कालावधी असतो, या आठ दिवसात प्रचंड मोठी उलथापालथ घडू शकते’, असे म्हटले जाते. मोदी सरकारला याचा अनुभव सध्या येत आहे. ललित मोदी प्रकरणावरून मोदी सरकारच्या भोवती टीकेचे मोहोळ उठले असतानाच भाजपाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणीला चार दशके पुरी होण्याचे निमित्त साधून मोदी सरकारवर लोकशाहीच्या तात्विक मुद्याचा आधार घेऊन तोफ डागली आहे. लोकशाही चिरडून टाकू शकणाऱ्या शक्ती आज जास्त प्रबळ झाल्या आहेत, असे अडवाणी यांचे प्रतिपादन आहे. पण तेवढ्यावरच थांबले तर ते अडवाणी कसले? सध्याचे राजकीय नेतृत्व प्रगल्भ नाही, असे म्हणता येणार नाही, पण या नेतृत्वात ज्या काही त्रुटी आहेत, त्यामुळे विश्वास वाटावा अशी स्थिती नाही, असाही शालजोडीतला टोला अडवाणी यांनी लगावला आहे. अडवाणी यांनी दिलेल्या या मुलाखतीचा अन्वथार्थ दोन प्रकारे लावणे गरजेचे आहे. त्यापैकी पहिला भाग हा अडवाणी यांना डावलून मोदी यांना नेतृत्वपदी बसविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निर्णय आणि भाजपामधील अडवाणी गटाची मोदी करीत असलेली कोंडी यांच्याशी संबंधित आहे. दुसरा भाग हा अडवाणींनी या मुलाखतीत जे काही ‘लोकशाही चिंतन’ केले आहे, त्या संदर्भातील आहे. मोदी यांना नेतृत्वपदी बसवण्याच्या संघाच्या निर्णयाला अडवाणी यांचा ठाम विरोध होता. पंतप्रधान होण्याच्या अडवाणी यांच्या मनिषेला पूर्ण विराम देणारा हा निर्णय असल्याने तो पचवणे त्यांना कठीण गेले आणि तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यातच निवडणूक जिंकून नेतृत्व हाती येताच पक्षातील अडवाणी गटाची कोंडी करण्याचे डावपेच मोदी खेळू लागले. किंबहुना निवडणुकीआधीच गोवा येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस न जाऊन मोदी यांच्या निवडीला अडवाणी यांनी विरोध दर्शवला, तेव्हा दिल्लीतील त्यांच्या घरासमोर मोदी समर्थकांनी निदर्शने केली होती. पक्षाबाहेरच्याच नव्हे, तर भाजपातीलही विरोधकांना गप बसविण्यासाठी मोदी काय करू शकतात, याची ही चुणूक होती. गेल्या वर्षभरात मोदी यांच्या अशा कार्यशैलामुळे अडवाणी व त्यांचा गट यांच्यात असंतोष खदखदत होता. तोच आणीबाणीला ४० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अडवाणी यांनी बोेलून दाखवला आहे. भाजपातील ही गटबाजी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आगामी बिहार निवडणुकीत भाजपाच्या हाती त्या राज्यातील सत्ता आली नाही, तर या गटबाजीला अंतर्गत लाथाळ्यांंचे स्वरूप येईल आणि मग विकासाच्या मुखवट्याआडचा मोदी यांचा खरा चेहरा देशापुढे येईल. पण बिहारमध्ये निसटता जरी विजय मोदी यांच्या पदरात पडला, तरी पक्षांतर्गत विरोधकांची कोडी करण्यासाठी मोदी अधिक दमदारपणे पावले टाकत राहतील. मोदी यांच्यावर शरसंधान करण्यासाठी अडवाणी यांनी आणीबाणीचा जसा सोयीस्कररीत्या वापर केला आहे, तोच प्रकार त्यांना आलेल्या लोकशाहीच्या उमाळ्याचा आहे. मोदी यांच्याऐवजी अडवाणी यांच्या हातीच नेतृत्वपदाची सूत्रे आली असती, तर त्यांना हा असा इतका लोकशाहीचा उमाळा आला असता काय? आणि अडवाणी यांना इतकीच राज्यघटनेने जनतेला दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची व लोकशाहीची चिंता आहे, तर उपपंतप्रधान असताना २००२ साली गुजरातेत हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिमांचा जो नरससंहार केला, तेव्हा अडवाणी का मोदी यांची सतत पाठराखण करीत होते? किंबहुना मोदी यांना दरवाजा दाखवावा, असे त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मत होते. पण अडवाणी त्याच्या आड आले. या प्रसंगाचे सविस्तर वर्णन जसवंत सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे. तेव्हा कोठे गेली होती आज अडवाणी व्यक्त करीत असलेली लोकशाहीबद्दलची त्यांची आस्था? आणि मूळ प्रश्न आहे, तो अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक राष्ट्रवादाची व त्या अनुरूप हिंदुत्वाची संकल्पना मानतात की नाही हाच. ती मी मानत नाही, असे काही अडवाणी अजूनपर्यंत तरी म्हणालेले नाहीत. तसे ते म्हणत नाहीत, तोपर्यंत आज त्यांना आलेला लोकशाहीचा उमाळा खोटा आहे, असेच मानणे भाग आहे; कारण भारतीय राज्यघटनेनुसार देशात प्रस्थापित झालेली आणि बहुसांस्कृतिकतेवर आधारलेली लोकशाही राज्यव्यवस्था संघाला मान्य नाही. भारतीय राज्यघटना ही निव्वळ विविध देशातील तरतुदी एकत्र करून विणलेली गोधडी आहे, तिचा येथील संस्कृतीशी काहीही संबंध नाही, ती फेकून दिली पाहिजे, असे संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवकर यांनी लिहूनच ठेवलेले आहे. ते अडवाणी नाकारू शकतच नाहीत; कारण याच सांस्कृतिक राष्ट्रवादामुळे त्यांनी अयोध्येची रथयात्रा काढली होती. त्यानंतर बाबरी मशीद पाडली गेली. तेव्हा अडवाणी यांनी नक्राश्रू ढाळले होते. भारतातील लोकशाहीचा वापर करून येथे संघाला ‘हिंदू राष्ट्र’ आणायचे आहे. त्यासाठी संघाची राजकीय आघाडी म्हणून आधी जनसंघ व नंतर भाजपा निवणुकीच्या राजकारणात सामील होत आले आहेत. आणीबाणी लादण्याची घोडचूक करून जनसंघ व संघाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी इंदिरा गांधी यांनी मिळवून दिली. आज संघाच्या हाती स्वबळावर सत्ता आली आहे. पण अडवाणी यांना पंतप्रधानपद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची जी मळमळ आहे, ती लोकशाहीचा खोेटा उमाळा आणून ते बोलून दाखवत आहेत. इतकाच अडवाणी यांना अचानक कंठ फुटण्याचा मर्यादित अर्थ आहे.