Shashi Tharoor: "पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय लोकशाहीचे संस्थापक होते आणि त्यांनी लोकशाहीची मुळे देशात घट्ट रोवली. मात्र, नेहरूंच्या प्रत्येक धोरणाचे मी समर्थन करतोच असे नाही. त्यांच्याही काही चुका झाल्या आहेत, त्या स्वीकारणे गरजेचे आहे," असे परखड मत काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ लेखक शशी थरूर यांनी व्यक्त केले. केरळ विधानसभेच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात बोलताना थरूर यांनी नेहरूंची वारसा आणि विद्यमान भाजप सरकारचा दृष्टिकोन यावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधताना थरूर म्हणाले, "मी मोदी सरकारला लोकशाहीविरोधी म्हणणार नाही, पण ते नक्कीच नेहरूविरोधी आहेत. आज देशासमोर कोणतीही समस्या आली की त्यासाठी नेहरूंना जबाबदार धरले जाते. नेहरूंना आजच्या काळातील एक सोयीस्कर बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे."
१९६२ च्या पराभवाची चूक मान्य
नेहरूंच्या धोरणांवर टीका करताना थरूर यांनी १९६२ च्या चीन युद्धाचा उल्लेख केला. "मी नेहरूंचा मोठा चाहता आहे, पण आंधळा समर्थक नाही. १९६२ च्या युद्धात भारताला पत्कराव्या लागलेल्या पराभवाचे काही श्रेय नेहरूंच्या चुकीच्या निर्णयांना दिले जाऊ शकते. त्या बाबतीत त्यांची टीका होणे रास्त आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीसाठी केवळ त्यांनाच दोषी ठरवणे हा भाजपचा अजेंडा आहे," असे शशी थरूर म्हणाले.
वाचन संस्कृती आणि लेखक थरूरआपल्या लेखक म्हणून असलेल्या प्रवासावर भाष्य करताना त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणी अस्थमामुळे घराबाहेर खेळता येत नसल्याने त्यांनी पुस्तकांनाच मित्र बनवले. त्यांचे पहिले हस्तलिखित लहानपणी शाई सांडल्यामुळे नष्ट झाले होते. श्री नारायण गुरु यांची जीवनी हे त्यांचे २८ वे पुस्तक असून, तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. १९८९ मध्ये भारतीय साहित्यात व्यंग्य कमी असल्याने त्यांनी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या भूमिकेवर स्पष्टीकरण
पक्षाच्या धोरणांपासून वेगळी भूमिका घेण्याच्या प्रश्नावर थरूर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही काँग्रेसच्या विचारधारेचे उल्लंघन केलेले नाही. "मी माझी मते मांडतो, पण बहुतांश वेळा माझी आणि पक्षाची भूमिका एकच असते. संसदेत मंत्र्यांना प्रश्न विचारणे ही एक स्पष्ट दिशा आहे, त्यामुळे पक्षाने अस्वस्थ होण्याचे कारण नाही," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
Web Summary : Shashi Tharoor acknowledged Nehru's errors, particularly regarding the 1962 war. He criticized the BJP for blaming Nehru for every problem, calling it unfair. Tharoor emphasized his alignment with Congress ideology despite expressing personal views.
Web Summary : शशि थरूर ने नेहरू की गलतियों, खासकर 1962 के युद्ध के संबंध में, को स्वीकार किया। उन्होंने हर समस्या के लिए नेहरू को दोषी ठहराने के लिए भाजपा की आलोचना की, इसे अनुचित बताया। थरूर ने व्यक्तिगत विचार व्यक्त करने के बावजूद कांग्रेस विचारधारा के साथ अपने संरेखण पर जोर दिया।