शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:05 IST

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर, बुधवारी अचानकपणे उत्तर दिल्ली महापालिकेने उपद्रवग्रस्त भागातील अतिक्रमणे बुलडोझरने हटविण्यात आली. 

नवी दिल्ली : दिल्लीतील जहाॅंगीरपुरीतील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. बुधवारी आदेश दिल्यानंतरही उत्तर दिल्ली महापालिकेच्या महापौरांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवल्याचा कृतीची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. 

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर, बुधवारी अचानकपणे उत्तर दिल्ली महापालिकेने उपद्रवग्रस्त भागातील अतिक्रमणे बुलडोझरने हटविण्यात आली. 

या कारवाईच्या विरोधात जमाते उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करून बुधवारी सकाळी ११ वाजता या कारवाईला स्थगिती दिली. परंतु, त्यानंतरही जवळपास दोन तास ही कारवाई सुरूच होती. 

उत्तर महापालिकेच्या या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्या. एल. एन. राव व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने महापौरांना आदेशाची माहिती कळविल्यानंतरही कारवाई सुरू ठेवण्याच्या कृतीची गंभीर दखल घेतल्याचे मत व्यक्त केले. या याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

काँग्रेसच्या नेत्यांना रोखले  - जहाॅंगीरपुरी भागात गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला जाण्यापासून रोखण्यात आले.- दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी जहाॅंगीपुरीत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना आधीच रोखले.- काँग्रेसने नेहमीच गरिबांचा कैवार घेतला आहे. त्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढा देईल, असेही माकन म्हणाले. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीdelhiदिल्लीEnchroachmentअतिक्रमणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय