शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

‘आदित्य’यान झेपावले अन् इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान; आजारातून सावरत असल्याचे केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 7:59 AM

खुद्द सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे...

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी आदित्य-एल१चे २ सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना त्याच दिवशी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोगाचे निदान झाले. खुद्द सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

‘’चंद्रयान-३ मोहिमेपासून मला आरोग्याच्या काही तक्रारी सुरू झाल्या, परंतु त्यावेळी नेमके काही स्पष्ट झाले नव्हते. पोटदुखीचा त्रास सुरू असल्याने आदित्य-एल१च्या प्रक्षेपणानंतर सायंकाळी मी तपासणीसाठी रुग्णालयात गेलो, तेव्हा चाचणीत पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी मी चेन्नईला गेलो, तिथे शस्त्रक्रिया करण्यात आली, किमोथेरपी झाली. कर्करोगाचे निदान होणे माझ्यासह कुटुंबासाठी धक्कादायक होते. 

सध्या मी आजार समजून घेऊन उपचार घेत आहे. या काळात इस्रोच्या सहकाऱ्यांनी मला बरीच हिंमत दिली. आता मी कर्करोगातून बऱ्यापैकी सावरलो आहे. त्यामुळे फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही,’’ असे सोमनाथ यांनी मुलाखतीत सांगितले.

अनेक यशस्वी मोहिमांचे नेतृत्व - एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळात इस्रोने अनेक यशस्वी मोहिमा राबविल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ यशस्वीरित्या लँडिंग करण्याची किमया भारताने पहिल्यांदाच केली. त्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. - पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉइंटवरून आदित्य एल१ सूर्याचा अभ्यास करणार आहे. यानंतर इस्रोने गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली आहे.

शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी कार्यालयातकर्करोगातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु मी त्यातून पूर्ण बरा होईन, असा विश्वास आहे. शस्त्रक्रिया व किमोथेरपीसाठी मी केवळ ४ दिवस रुग्णालयात होतो, त्यानंतर पाचव्या दिवशी मी इस्रोत कामावर रुजू झालो. परंतु नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार सुरू आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.  

टॅग्स :isroइस्रोcancerकर्करोग