लोकमत आपल्या दारी जोड.. ६
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30
चौकात गतिरोधक बसवावेत...

लोकमत आपल्या दारी जोड.. ६
च कात गतिरोधक बसवावेत...ग्रोथ सेंटर भागातून तरुण मुले धूम स्टाईल गाड्या पळवीत आहेत. चौकात गतिरोधक नसल्यामुळे अपघात होत आहेत. मागील काही दिवसांत महावितरण कार्यालयासमोरील चौकात तीन-चार अपघात झाले आहेत. प्रशासनाने प्रत्येक चौकात गतिरोधक बसवावेत, अशी संदीप वराडे यांची मागणी आहे. रस्त्याचे डांबरीकरण करावे...सिडको प्रशासनाने केवळ कार्यालयालगतचे रस्ते चकाचक केले. ग्रोथ सेंटर भागातील अंतर्गत रस्ते तसेच आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिडको प्रशासनाने अंतर्गत रस्त्यांचेही डांबरीकरण करावे, असे बाबासाहेब सदावर्ते यांचे म्हणणे आहे.