लोकमत आपल्या दारी जोड १
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
नागरिकांच्या प्रतिक्रिया

लोकमत आपल्या दारी जोड १
न गरिकांच्या प्रतिक्रियाॲड. सुमतीलाल बलदोटा-माणिक चौकातील कारंजे अनेक वर्षापासून बंद आहे. तेथेच सेनापती बापट यांचा पुतळा आहे, त्याची स्वच्छता होत नाही. पाणी कमी दाबाने येते. स्वच्छता कर्मचारी कधीतरी येतात. नागरिक स्वत:च साफसफाई करतात. रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पथदिवे अधून-मधून बंद असतात. ............शिरीष बापट- बाहेरगावाहून येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. परिसरात मोठमोठी हॉस्पिटल आहेत, पार्किंगची सोय नसल्याने तेथे येणारे रुग्ण रस्त्यावर वाहने लावतात. रस्ते आहेत, मात्र त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. .........अविनाश बेडेकर- पाणी नियमित व भरपूर येते. स्वच्छता कर्मचारीही येतात. मात्र प्रभागातील रस्त्यांवर खूप खड्डे झाले आहेत. नगरसेवकांनी प्रत्येक गल्लीत जाऊन समस्या जाणून घेतल्या पाहिजे. बार्शीकर तसेच करत. रस्त्यावर पडलेले खड्डे हीच मोठी समस्या आहे. ........रुख्मिणी भिमण- ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेने वर्षापूर्वी रस्ता खोदून ठेवला. अजूनही तो दुरूस्त केलेला नाही. खोदाईपूर्वी रस्ता चांगला होता. नगरसेवक व महापालिकेने हे काम त्वरित केले पाहिजे. खडबडीत रस्त्यांवरून चालताना ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो. ............दर्शना मुळे - अत्यंत कमी दाबाने येते. त्यामुळे काही घरांना पाणीच मिळत नाही. बेडेकर यांच्या घराशेजारच्या बोळीतील रस्ता खोदून ठेवला आहे. रस्ता दुरूस्त कधी होणार? पाणी हीच खरी समस्या आहे. कर वसुली करणार्या महापालिकेने नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत. ...........सुशीला तांदूळवाडकर- पाणी नियमित येते. स्वच्छताही होते. पथदिवे रात्री बंद असतात. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते नव्याने डांबरीकरण झाले पाहिजेत. /..............किशोर डागवाले, नगरसेवक- गत २५ वर्षापासून नगरसेवक आहे. प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या तांबटकर गल्ली, पापय्या गल्ली परिसरात विकास कामे झालेली नाहीत. मात्र १० लाखाचा नगरसेवक निधी, ५० लाखाचा सभापती असतानाचा निधी, १२ लाख आमदार निधी, २० लाख खासदार निधीतून विविध विकास कामे प्रस्तावित केली आहेत. दोन वर्षात प्रभागात एकही समस्या राहणार नाही. मंगल कार्यालये व हॉस्पिटलची पार्किंग सुरू करा अशी मागणी अनेकदा केली, मात्र महापालिका प्रशासन कठोर,बेधडक कारवाई करत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होते. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे प्रभागात विकास कामे सुरू नाहीत.